Petrol Diesel Price on 5 August 2023:  आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत वाढ वारंवार सुरूच आहे. शुक्रवारीही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत (Petrol Diesel Price) वाढ नोंदवण्यात आली आहे. ब्रेंट क्रूड ऑइल आणि डब्ल्यूटीआय (WTI) क्रूड ऑइलचे दर सातत्याने वाढत आहेत. ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत 1.29 टक्क्यांनी वाढली आहे आणि प्रति बॅरल 86.24 डॉलरवर विकले जात आहे. त्याच वेळी, डब्ल्यूटीआय क्रूड ऑइलच्या किंमतीत 1.56 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे आणि ते प्रति बॅरल 82.82 डॉलरला विकले आहे. दुसरीकडे पेट्रोल-डिझेलचे दर नेहमीप्रमाणे आज सकाळी 6 वाजता जाहीर करण्यात आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव भडकले असून, याच दरम्यान सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले आहेत. मात्र हा शनिवार देखील दिलासा देणारा आहे, कारण 445 व्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. 21 मे 2022 रोजी शेवटचा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाला होता. नोएडा, गुरुग्राम, आग्रा या शहरांमध्ये इंधन स्वस्त झाले आहे. दुसरीकडे, मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि दिल्ली या चार महानगरांमध्ये किमती स्थिर आहेत.


देशातील सर्वात महाग इंधन राजस्थानमध्ये आहे. श्रीगंगानगरमध्ये पेट्रोलची किंमत 113.48 रुपये आहे तर डिझेलची किंमत 98.24 रुपये आहे. पोर्ट ब्लेअरमध्ये दुसरे सर्वात स्वस्त पेट्रोल 84.10 आणि डिझेल ₹ 79.74 प्रति लिटर आहे. दुसरीकडे, सर्वात महाग पेट्रोल-डिझेल राजस्थानमध्ये आहे.


दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि एक लिटर डिझेल 94.27 रुपयांना विकलं जात आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लीटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि एक लीटर डिझेल 94.24 रुपयांना विकले जात आहे.


देशात पेट्रोल डिझेल 100 रुपयांच्या वर


आजही अनेक राज्यांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या वर विकले जात आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिलासा मिळूनही ओडिशा, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये डिझेल अजूनही 100 रुपयांच्या वर आहे. कर्नाटक, पंजाब, मणिपूर, पश्चिम बंगाल, बिहार, केरळ, महाराष्ट्र, तेलंगणा, सिक्कीम, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधील सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या वर आहे.