मोठा खुलासा : भरपूर आयुष्य जगायचंय मग बना आळशी...
संशोधनात समोर आली माहिती
मुंबई : तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. तुम्ही कायम ऐकलं असेल की, धावपळ करून थांबण्यास मनाई आहे. कारण जर तुम्हाला आता सांगितलं की, भरपूर मोठं आयुष्य जगायचंय असेल तर चक्क तुम्हाला आळशीपणा करावा लागणार आहे. म्हणजे काम करा पण ते अतिशय आरामात आणि सावकाश. आम्हाला कल्पना आहे, आळशी बनून कसं जास्त दिवस जगता येईल. पण एका सर्व्हेमध्ये हा खुलासा झाला आहे की, आळशीपणा केल्यामुळे तुम्ही बराच काळ जगू शकता.
पूर्ण दिवस काम न करता फक्त बेडवर लोळत राहणं. यामुळे तुम्हाला कोणतंच टेन्शन येणार नाही. हे आम्ही नाही तर एका संशोधनात याचा खुलासा झाला आहे. ईवॉल्यूशन 'सर्वाइवल ऑफ द लेजीएस्ट' अशाच पद्धतीने हा शोध करण्यात आला आहे. जवळपास 299 लोकांच्या सवयींचा या संशोधनात अभ्यास करण्यात आला आहे. संशोधनात अशी माहिती समोर आली आहे की, मेटाबॉलिजम रेट ज्यांच्यामध्ये अधिक असतो त्यांच्या जीवाला अधिक धोका असल्याच समोर आलं आहे. संशोधक डॉक्टर ल्यूक स्ट्रॉज यांनी सांगितलं की, जास्त एनर्जी खर्च करणाऱ्या लोकांच्या जीवाला अधिक धोका असतो.
मोलस्क प्रजातीमध्ये शिंपले किंवा गोगलगाय येतात. संशोधनात असे आढळले आहे की, मोलस्क प्रजातीचे जीव अधिक काळ जगतात. या प्रजातीचा विचार केला म्हणजे गोगलगाय किंवा शिंपल्यांचा विचार केला तर त्यांच्यात स्थिरता अधिक असते. या शांत पडून राहतात. म्हणून त्यांच आयुष्य जास्त असल्याचं समोर आलं आहे. यांच मेटापॉलिझम रेट खूप कमी असतो.