मुंबई : कोणताही कार्यक्रम म्हटलं की फोटो व्हिडीओ शूट आपण सगळे करतो. आता सोशल मीडियाचा काळ असल्यामुळे कार्यक्रमानंतर आपण व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करतो. सध्या सोशल मीडियावर असाचं एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये नवरदेवावर अशी वेळ येते, ज्यामुळे तो वडिलांनाचं होणाऱ्या पत्नीला वरमाला घालायला सांगतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नवरदेव आणि नवरी दिसत आहे. नवरदेव होणाऱ्या पत्नीला हार घालत असताना लाजताना दिसत आहे. नवरी मात्र एक शब्द देखील बोलत नाही. त्यानंतर नवरदेव इतका लाजतो की तो वडिलांचं हार घालण्यास सांगतो. नवरदेव  नवरीच्या डोक्यवर वरमाला फेकतो आणि पळून जातो... पाहा व्हिडीओ...



नवरदेवाचं अशी वागणूक पाहून वधूलाही आश्चर्य वाटते. कारण ती जयमाला वधूच्या गळ्यात न जाता खाली जमिनीवर पडते. हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर खूप वेगाने पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 11 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.