नवी दिल्ली :  जर तुम्ही नोकरी करीत असाल तर, तुमच्यासाठी कामाची बातमी आहे. तुम्हालाच माहितीच असेल की, सरकार लवकरच New Wage Code लागू करणार आहे. हे कोड जुलै पासून लागू होण्याची आशा होती. New Wage Code मध्ये नोकरदारांसाठी 4 दिवस काम आणि 3 दिवस सुट्टीचा नियम असणार आहे.


'New Wage Code योग्य वेळी लागू केले जातील'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय श्रम मंत्री भूपेंद्र यादव यांनी New Wage Code  वर बोलताना म्हटले की, जवळपास सर्व राज्यांनी 4 श्रम संहितांचा मसूदा तयार केला आहे. त्यांनी पुढे म्हटले की, योग्य वेळ आली की New Wage Code  लागू केले जातील. 


नव्या वेज कोडला लागू करण्यात येणार असल्यामुळे याचे थेट परिणाम तुमच्या हातात येणाऱ्या पगारावर अर्थात इन हँड सॅलरीवर होणार आहेत. New Wage Code 2019 जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून लागू करण्यात येणार आहे. 


उदाहरणार्थ कोणत्याही कर्मचाऱ्याच्या सीटीसीमध्ये मूळ वेतन, एचआरए, निवृत्तीनंतर मिळणारे फायदे (पीएफ, ग्रॅच्युटी आणि इतर) यांची आकडेवारी बदलणार आहे.