New year eve 2021 : Best Meme पाहून हसतमुखानं द्या सरत्या वर्षाला निरोप
आताच क्लिक करा
मुंबई : 2021 हे वर्ष पाहता पाहता संपायलाही आलं. अवघ्या काही तासांनंतर सार जग 2022 मध्ये पदार्पण करणार आहे. सरत्या वर्षात राहिल्यासाहिल्या सर्व गोष्टी, झाल्या चुका मागे सारत एक नवी सुरुवात करण्यासाठी सर्वजण उत्सुक दिसत आहेत. अगदी कितीची अडचणी असो, संकटं असो या वर्षाला मोठ्या उत्साहात आणि हसतमुखानंच निरोप देण्याचा अनेकांचाच अट्टहास दिसत आहे.
आता चेहऱ्यावर हसू आणायचंय आणि सोशल मीडियाचा आधार नाही, हे किमान सध्या तरी शक्यच नाही.
यंदाच्या वर्षात काही प्रसंगांना अनुसरून असे कैक मीम्स व्हायरल झाले जिथं खरंच या नेटकऱ्यांचं डोकं कसं आणि कुठे चालेल याची शाश्वती नाही हीच प्रचिती आहे.
कतरिनाच्या लग्नापासून केंद्रीय अर्थसंकल्पापर्यंत प्रत्येक वेळी मीम्स व्हायरल झाले आणि तणावाची परिस्थिती काहीशी हलकी झाली. चला तर मग नजर टाकूया अशाच काही धमाकेदार आणि खळखळून हसवणाऱ्या मीम्सवर...
मीम्समध्ये अनेकदा फोटो म्हणा किंवा प्रसंग म्हणा, प्रत्येक गंभीर स्वरूपावर विनोदी अंगानं नेटकऱ्यांनी टीप्पणी केली.
मुख्य म्हणजे काही उपहासात्मक मीम्स यामध्ये विशेष लक्ष वेधून गेले. काही मीम्स तर अनेकांचे कानही टोचले.... तुम्ही यंदाच्या वर्षात पाहिलेले असे धमाल मीम्स कोणते?