संदीप सिंह, मनाली : नव्या वर्षाचं स्वागत करायला गेलेले पर्यटक मनालीमध्ये अडकून पडले. पर्यटक जे बर्फ पाहण्य़ासाठी मोठ्या हौसेनं मनालीत गेले. जो बर्फ पाहण्य़ासाठी म्हणून ते गेले, तोच बर्फ या पर्यटकांसमोर संकट होऊन उभा राहिला. मनालीतल्या अटल टनेलमध्ये एवढा बर्फ पडला की थर्टीफर्स्टचं स्वागत करण्यासाठी मनालीत आलेले सगळे पर्यटक अटल टनेलमध्ये अडकून पडले. बर्फवृष्टीमुळे रस्ते बंद झाले. त्यामुळे शेकडो गाड्यांच्या रांगाच्या रांगा लागल्या होत्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नव्यानं बांधण्यात आलेला अटल बोगदा पाहण्यासाठी पर्यटक गेले. पण रस्त्यावर एवढा बर्फ पडला की रस्ताच बंद झाला. त्यामुळे शेकडो वाहनांच्या रांगाच्या रांगा पाहायला मिळाल्या. बर्फामधून चालणंही कठीण होतं.


या पर्यटकांची सुटका करण्यासाठी प्रशासनाच्या मोठमोठ्या गाड्या आल्या. पण इथे आधीच जवळपास ५०० गाड्या अडकून पडल्या होत्या. त्यामुळे अडकून पडलेल्या लोकांपर्यंत पोहोचणं हेच मोठं आव्हान होतं. 



स्थानिक लोकांनीही अडकून पडलेल्या पर्यटकांची सुटका करण्यासाठी मदत केली. या थंडीच्या मौसमात तुम्हीही डोंगराळ भागात फिरायला जाणार असाल तर आधी हवामानाचा मूड चेक करा आणि मगच जा.