Love, लग्न आणि लोचा : हनीमूनला असं काय घडलं? की त्यांनी उचललं धक्कादायक पाऊल
प्रेमविवाह असूनही दोघांनी उचललं टोकाचं पाऊल
मुंबई : दोघांचा प्रेम विवाह... लग्नानंतर ग्रँड रिसेप्शन मात्र हनीमूनच्यावेळी नव दाम्पत्याने केला आत्महत्येचा प्रयत्न. हा संपूर्ण प्रकार धक्कादायक आहे. प्रेमाच्या नात्याचं रुपांतर लग्नात झालं. सारं काही अगदी मनासारख आलबेल असताना असं काय झालं? हा सवाल साऱ्यांनाच पडलाय. बिहारच्या गोपालगंज येथील ही घटना.
लव्ह मॅरेजनंतर केला आत्महत्येचा प्रयत्न
गोपालगंज येथील मीरजगंज परिसरात राहणाऱ्या चंद्रिका सिंह यांचा 30 वर्षांचा मुलगा मुकेश कुमार सिंहचं नुकतंच लग्न झालं. मुकेशने जमशेदपूरमधील सोनाटे येथे राहणारी 28 वर्षांच्या शांतीने रविवारी मंदिरात लग्न केलं. यानंतर घरी रिसेप्शनची पार्टी करण्यात आली. रिसेप्शननंतर नव दाम्पत्य आपल्या खोलीत निघून गेले. त्यानंतर दोघांनी विष घेण्याचा प्रयत्न केला.
शनिवारी मंदिरात लग्न झाल्यानंतर रविवारी घरी जेवणाचा कार्यक्रम पार पडला. नातेवाईक, आप्तेष्टांसोबत जेवणाचा कार्यक्रम झाला. जेवून नवं दाम्पत्य झोपायला आपल्या खोलीत गेलं. ही या दोघांची पहिली रात्र. मात्र या दोघांनी जेवणाच्या अगोदरच विष प्राशन केलं होत.
यांनी एवढं मोठं पाऊल का उचललं याचा कुटुंबियांनी धक्का बसला आहे. यानंतर त्यांना उल्टी होण्याकरता गटारातील पाणी देखील पाजण्यात आलं. मात्र त्यामुळे काहीच फरक पडला नाही. त्यानंतर दोघांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केलं.
गंभीर परिस्थितीत रूग्णालयात दाखल
रिपोर्टनुसार, दोघंही एका खोलीत बेशुद्ध अवस्थेत सापडले. नातेवाईकांनी या दोघांना गंभीर परिस्थितीत गोपालगंज रूग्णालयात दाखल केलं. अत्यावश्यक वॉर्डमध्ये या दोघांवर उपचार सुरू झाले. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांनी विष घातलेलं चिकन खाल्ल होतं. मात्र सगळं ठिक झाल्यानंतरही या दोघांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला? हा साऱ्यांनाच प्रश्न पडला होता. या प्रकरणाचा पोलीस तपास घेत आहे.