Women Dumpes Husband For Money: लग्नला (Marriage) जगभरातील प्रत्येक समाजामध्ये मानाचं स्थान आहे. भारतामध्येही विवाहसंस्थेला (Wedding) विशेष महत्त्व असून लग्न ही समाजिक जडणघडणीमधील अत्यंत महत्त्वाची गोष्ट मानली जाते. त्यामुळेच अगदी धुमधडाक्यामध्ये लग्नं करण्याला भारतीय प्राधान्य देतात. लग्नांच्या निमित्ताने घरोघरी होणारे सेलिब्रेशन आणि आनंदोत्सव हे कायमच चर्चेत असतात. लग्नाच्या तयारीपासून ते अगदी मुलीला नांदायला सासरी पाठवण्यापर्यंतच्या गोष्टींचं नीट नियोजन केलं जातं. येणाऱ्या पाहुण्यांना काही त्रास होणार नाही, नीट पाहुणचार होईल याची काळजी घेतली जाते. लग्नाबरोबरच हनीमून आणि लग्नाच्या पहिल्या रात्रीबद्दलही नवदांपत्याच्या जवळच्या लोकांमध्ये विशेष चर्चा असते. खास करुन उत्तर भारतामध्ये सुहागरात आणि त्यासंदर्भात नवदांपत्याची मस्करी करण्याचा ट्रेण्ड अनेकदा हिंदी चित्रपटांमधून पहायला मिळाला आहे. लग्नाप्रमाणेच सुहागरातही खास व्हावी यासाठी अगदी बेडरुम सजवण्यापासून ते इतर अनेक गोष्टींपर्यंतची तयारी करण्यात घरचेही मदत करतात. मात्र लग्नाच्या या पहिला रात्रीच नववधूने नवऱ्याला फसवलं तर? असाच काहीसा प्रकार मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये घडला.


मासिक पाळीचं कारण दिलं अन्...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर पक्षाला फसवण्याच्या हेतूने जाणूबुजून लग्न करण्यात आल्या. एका मध्यस्थ्याच्या माध्यमातून हे लग्न ठरलं होतं. ठरलेल्या दिवशी प्रथा-परंपरांप्रमाणे लग्न लावून देण्यात आलं. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरा मुलगा आपल्या पत्नीबरोबर संसार करण्याची स्वप्नं पाहत होता. लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीच या तरुणीने आपल्या नवऱ्याला जवळ येऊ दिले नाही. माझी मासिक पाळी सुरु असून मला शरीरसंबंध ठेवता येणार नाही, असं या तरुणीने तिच्या नवऱ्याला सांगितलं. पुढील काही दिवस आपल्याला काहीच करता येणार नाही असंही तिने सांगितलं. मात्र लग्नाच्या 7 व्या दिवशी ही तरुणी घरातून पळून गेली. तपास केल्यानंतर ही तरुणी ज्या मध्यस्थीच्या माध्यमातून लग्न ठरवण्यात आलेले त्याच्याच घरी आपत्तीजनक अवस्थेत सापडली. मात्र या तरुणीचा भांडाफोड झाल्यानंतर तिच्याबरोबर या कटात सहभागी असलेले सर्वजण फरार झाले.


संपूर्ण गँग कार्यरत


लग्न जरी फसवणूक करण्याच्या उद्देशाने झालं होतं तरी ते सर्व परंपरा आणि प्रथांनुसार पार पडलं. लग्नानंतर या तरुणीने आठवडाभर काही ना काही कारण सांगून आपल्या पतीला आपल्या जवळ येऊ दिलं नाही. लग्नाच्या 7 व्या दिवशी ही तरुणी आपल्या नवऱ्याच्या घरातून सोन्याचं मंगळसुत्र, नवे कपडे, चांदीचे दागिने आणि जवळजवळ 3 लाख रुपये रोख रक्कम घेऊन फरार झाली. लग्न लावून तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीमधील ही तरुणी आहे. केवळ पैशांसाठी तिने हे लग्न केलं होतं. लग्न झाल्यानंतर काही दिवस मुलाबरोबर त्याच्या घरी रहायचं आणि नंतर दागिने आणि रोख रक्कम घेऊन पसार व्हायचं अशी यांची मोडस ऑपरेंडी आहे.


नको त्या अवस्थेत सापडली


काही दिवसांपूर्वीच घरी सून म्हणून आलेली तरुणी अशी अचानक गायब झाल्याने तिच्या सासरच्या लोकांनी तिचा शोध सुरु केला. घरातील सर्व दागिने आणि पैसेही गायब असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर घरातील लोक ज्या मध्यस्थीच्या माध्यमातून हे लग्न लावण्यात आलं होतं त्या व्यक्तीच्या घरी पोहोचले. त्यावेळी ही तरुणी या मध्यस्थी राहिलेल्या तरुणाबरोबर आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आली. समोरचं दृष्य पाहून या तरुणीचा नवरा आणि त्याच्या घरच्यांना मोठा धक्का बसला. यानंतर हा सर्व लग्नाचा घाट केवळ चोरी करण्यासाठी घातल्याचा खुलासा झाला. या प्रकरणामध्ये पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी एक मोठी टोळी यामागे सक्रीय असल्याचं म्हटलं आहे.