मुंबई : संरक्षण दलाच्या प्रमुखपदी आणखी एक मराठी नाव जुडलं जाणार आहे. आर्मी चिफ मुकुंद नरवणे यांच्यानंतर आता हवाई दलाच्या प्रमुख पदी महाराष्ट्राचे सुपुत्र एअर मार्शल विवेक राम चौधरी (Air Marshal VR Chaudhari) विराजमान होणार आहेत. भारतीय वायू दलाचे प्रमुख आर.के.एस भदौरीया (Air Chief Marshal RKS Bhadauria) हे येत्या 30 सप्टेंबर रोजी निवृत्त होत आहेत. 1 ऑक्टोबर रोजी मराठवाड्यातील नांदेडचे भूमीपुत्र विवेक चौधरी हे नवे एअर चीफ मार्शल होणार आहे. त्यांच्या नियुक्तीचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशाचे नवे एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी हे नांदेडमधील हदगाव तालुका येथील हस्तरा गावचे मूळ राहवाशी आहेत. त्यांचे वडील तेलंगणातील हैदराबाद येथे स्थायिक झाले. ते हैद्राबाद येथील भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड या कंपनीत काम करत होते. विवेक राम चौधरी यांच्या आई शिक्षिका होत्या.


व्ही आर चौधरी कोण आहेतय़


एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी सध्या वायस चीफ ऑफ एअर स्टाफ पदावर आहेत. एअर मार्शल व्ही. आर चौधरी यांना 29 डिसेंबर 1982 रोजी भारतीय हवाई दलाच्या लढाऊ प्रवाहात दाखल करण्यात आले. ते सध्या वायफ चीफ ऑफ एअर स्टाफ पदावर आहेत आणि त्यांनी विविध स्तरांवर विविध कमांड, स्टाफ जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. परम सेवा पदक, अति विशिष्ठ सेवा पदक आणि वायु सेना पदकासह त्यांच्या सेवेदरम्यान त्यांना विविध पदके आणि सन्मान देऊन गौरविण्यात आले आहे.


3800 तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव


व्हीआर चौधरी 1 ऑगस्ट 2020 पासून वेस्टर्न एअर कमांडचे प्रमुख होते. 29 डिसेंबर 1982 रोजी त्यांना भारतीय हवाई दलाच्या लढाऊ प्रवाहात एक लढाऊ पायलट म्हणून समाविष्ट करण्यात आले आणि त्यांनी सुमारे 39 वर्षे सेवा केली. व्ही.आर. चौधरी यांच्याकडे 3800 तासापेक्षा अधिक विविध प्रकारचे लढाऊ आणि प्रशिक्षक विमान उडवण्याचा अनुभव आहे.


राफेल डीलमध्ये मुख्य भूमिका


भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख असल्याने व्ही आर चौधरी राफेल कराराशीही संबंधित होते. फ्रान्समधील लढाऊ विमान प्रकल्पाच्या प्रगतीचे निरीक्षण करणाऱ्या द्विपक्षीय उच्चस्तरीय गटाचे ते प्रमुख आहेत.