NIA Raids : देशाच्या कानाकोपऱ्यात असंख्य घडामोडी सुरु असतानाच राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएकडून बुधवारी एक मोठी कारवाई करण्यात आली. ज्यामध्ये जवळपास 100 हून अधिक ठिकाणांवर धाड टाकण्यात आली. हरियाणा, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंजड आणि मध्य प्रदेश या सहा राज्यांमधील बऱ्याच ठिकाणांवर एनआयएकडून दहशतवादी कुरापती आणि अंमली पदार्थ तस्करीशी संबंधीतांना ताब्यात घेतला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील पोलीस यंत्रणांच्या साथीनं दहशतवाद विरोधी पथकानं बुधवारी सकाळपासूनच ही कारवाई सुरु केल्याचं पाहायला मिळालं. प्राथमिक स्तरावर समोर आलेल्या माहितीनुसार मागील वर्षी एनआयएकडून दाखल करण्यात आलेल्या RC 37, 38, 39/2022/NIA/DLI गुन्ह्यांअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. 



पंजाब पोलीस मुख्यालयावर हल्ला करणारा ताब्यात 


दरम्यान, मे 2022 पंजाब पोलिसांच्या मोहाली येथील मुख्यालयावर आरपीजी हल्ला करणाऱ्या एका संशयित दीपक रंगा याला यंत्रणांनी यंदाच्या वर्षी 25 जानेवारीला ताब्यात घेतलं होतं. गोरखपूर येथून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. समोर आलेल्या माहितीनुसार तो गँगस्टरनंतर दहशतवादाकडे वळलेलल्या लखबीर सिंग संधू उर्फ लांडा आणि पाकिस्तानस्थित दहशतवादी हरविंदर सिंग संधू उर्फ रिंदा यांचा सहकारी होता. आरपीजी हल्ल्यासोबत दीपकच्या नावे हत्या आणि इतरही काही गंभीर प्रकरणी गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती.