Crime News : एक धक्कादायक आणि खळबळजनक प्रकरण समोर आलाय. बिहारची राजधानी पाटणामधील कुजवा गावात शुक्रवारी पडक्या घरात तरुण तरुणीचे मृतदेह सापडले. पोलिसांनी या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची चौकशी केल्यावर धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी रात्री घरात सगळे झोपले असताना तरुणी शेजाऱ्या तरुणाला भेटायला पडक्या घरात गेली. त्या तरुणासोबत त्या तरुणीचे प्रेम प्रकरण होते. अचानक रात्री भावाला पडक्या घरातून आवाज येऊ लागला. तो उठून तिथे गेल्यावर बहिणीला बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंकज कुमार मिश्रा यांनी सांगितलं की, शुक्रवारी पहाटे 3 वाजता पोलिसांना कुजवा गावातील एका पडक्या घरात दोन मृतदेह असल्याची माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलीस पथकाला दोघांचेही मृतदेह जमिनीवर पडलेले आढळले. ते म्हणाले की, दोन्ही मृतक गेल्या अनेक महिन्यांपासून एकमेकांच्या संपर्कात होते, असे प्राथमिक तपासात समोर आलंय. एसडीपीओ पुढे म्हणाले की, पोलिसांनी मुलीचा भाऊ विशाल याची चौकशी केली. विशालने सांगितले की, काल रात्री त्याला घराबाहेर आवाज ऐकू आला तेव्हा तो कारण शोधण्यासाठी बाहेर गेला. तो मोडकळीस आलेल्या घरात गेला असता त्याला त्याची बहीण आणि तरुण आक्षेपार्ह अवस्थेत दिसले. भावाचा नाव विशाल कुमार आहे, तर तरुणीचा ना प्रतिमा राणी आणि अवनीश कुमार असं होतं. तरुण आणि तरुणीच्या मृत्यूने आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडालीय.


हेसुद्धा वाचा - मुलगा परदेशात, मध्यरात्री सुनेच्या खोलीतून आवाज ऐकून सासरच्यांना जाग आली; मग...


पुढे पोलीस अधिकारी पंकज मिश्रा यांनी सांगितलं की, बहीणाला अशा अवस्थेत पाहून भावाला राग अनावर झाला. त्याने तिथे पडलेल्या तुटलेल्या बाटलीने अवनीशवर हल्ला करण्यास सुरुवात केली. विशालने अवनीशला बेदम मारहाण केली. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अवनीशची हत्या केल्याची कबुली विशालने पोलिसांना दिलीय. विशालने पोलिसांना सांगितलं की, या घटनेनंतर त्याची बहीण घरी आली आणि तिने कथितरित्या काही विषारी पदार्थ प्राशन केले. ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. एसडीपीओ म्हणाले की, कथितरित्या विषारी द्रव्य प्राशन केल्यानंतर प्रतिमा जीर्ण घरात कशी पोहोचली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.


 मीडिया रिपोर्ट्सनुसार, एक दिवस आधी मृताचे वडील हरिशंकर यादव यांनी बिहटा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती. मुलगा अवनीश कुमार बेपत्ता झाल्याची नोंद केली होती. पोलीस प्रकरणाच्या तपासादरम्यान दोघांचेही मृतदेह मुलीच्या जुन्या घरातून सापडले आहेत.