शिमला : हिमाचल प्रदेश सरकारने मंडी, शिमला, कुल्लू आणि कांगडा जिल्ह्यात २४ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरपर्यंत रात्री कर्फ्यूची घोषणा केली आहे. ३१ डिसेंबरपर्यंत ५० टक्के क्लास ३ आणि क्लास ४ कर्मचारीच कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच राज्यातील शैक्षणिक संस्था देखील बंद राहणार आहेत. १ जानेवारी ते १२ फेब्रुवारीपर्यंत संस्था बंद राहणार आहेत. ऑनलाईन अभ्यासक्रम या दरम्यान घेतला जाणार आहे.



हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने सरकारने हा निर्णय़ घेतला आहे.



भारतात मागील २४ तासात कोरोनाचे ४४,०५९ रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे एकूण कोरोना संसर्गाची संख्या ९१,३९,८६६ झाली आहे. तर गेल्या २४ तासात ५११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात एकूण मृतांचा आकडा १,३३,७३८ वर गेला आहे.


देशात सध्या अजूनही ४,४३,४८६ रुग्ण उपचार घेत आहेत. गेल्या २४ तासात ४१,०२४ जण बरे झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत एकूण ८५,६२,६४२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.