वडिलांनंतर मुलगी आणि आता मुलगा सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायधीशपदी
सर्वोच्च न्यायालयासाठी आजचा दिवस हा ऐतिहासिक ठरला.
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयासाठी आजचा दिवस हा ऐतिहासिक ठरला. सर्वोच्च न्यायालयाला आज 9 नवे न्यायाधीश मिळाले. सकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या ऑडिटोरियममध्ये न्यायाधीशांचा शपथविधी पार पडला. या 9 न्यायाधीशांना शपथ देण्यात आली. शपथविधी कार्यक्रमासोबतच अनेक अशा गोष्टी घडल्या, ज्या याआधी कधीच झाल्या नव्हत्या. पहिल्यांदाच शपथविधी सोहळ्याचं ऑनलाईन प्रक्षेपण करण्यात आलं. (Nine judges take oath as Supreme Court judges)
सर्वोच्च न्यायालयात एकाचवेळी तीन महिला न्यायाधीशांनी शपथ घेतली. त्यामुळे आता एकाच वेळेस 4 महिला न्यायाधीश न्यायनिवाडा करताना दिसतील. कर्नाटक उच्च न्यायालय ते सर्वोच्च न्यायलयाचे न्यायधीश होताच न्यायाधीश बी व्ही नागरत्ना यांनी अनेक विक्रम प्रस्थापित केलं. काही वर्षानंतर त्या (Chief Justice of India) भारताच्या मुख्य न्यायाधीश होतील. त्यानंतर पहिल्यांदाच असं होईल की वडिलानंतर एखादी मुलगी मुख्य न्यायाधीश होईल.
वडिलानंतर आता मुलगीही मुख्य न्यायाधीश
सेवा ज्येष्ठेतनुसार 2027 मध्ये देशात पहिल्यांदा बी वीव्ही या महिला मुख्य न्यायाधीश होतील. मात्र त्यांचा या पदाचा कार्यकाळ फार कमी असेल. त्यांचे वडील न्यायाधीश ईएस वेंकटरमय्या हे 1989 मध्ये मुख्य न्यायाधीश बनले होते. भारताच्या न्यायपालिकेच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा वडिलानंतर मुलगी मुख्य न्यायाधीश बनेल.
सेवा ज्येष्ठतेनुसार, न्यायाधीश डीवाय चंद्रचूड हे नोव्हेंबर 2022 मध्ये मुख्य न्यायाधीशपदी विराजमान होतील. त्यांचे वडील न्यायाधीश वाय बी चंद्रचूड यांची 1978 मध्ये मुख्य न्यायाधीशपदी वर्णी लागली होती. चंद्रचूड यांची कारकिर्दही विक्रमी राहिली. त्यांनी 7 वर्ष न्यायदानाचं काम केलं.
आधी काका आता पुतण्या
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राहिलेले दीपक मिश्रा यांचे काकाही मुख्य न्यायाधीश होते. दीपक मिश्रा हे 14 महिने मुख्य न्यायाधीशपदी होते. दीपक मिश्रा यांचे काका रंगनाथ मिश्रा हे 25 सप्टेंबर 1990 ते 24 नोव्हेंबर 1991 या दरम्यान मुख्य न्यायाधीश होते. दीपक मिश्रा हे ऑगस्ट 2017 मध्ये मुख्य न्यायाधीश झाले. दीपक मिश्रा हे 45 वे मुख्य न्यायाधीश ठरले. ते 14 महिने या पदावर राहिले.