हैदराबाद : हैदराबादमध्ये संततधार पाऊस पडल्यानंतर मोठी दुर्घटना घडली. बदलागुडा येथे भिंत कोसळल्याने 2 महिन्यांच्या बाळासह 9 जणांचा मृत्यू झाला आहे. चंद्रमुत्ता पोलीस स्टेशन परिसरातील मोहम्मदिया हिल्स भागात मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली. दहा घरांवर ही भिंत कोसळली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असदुद्दीन ओवैसींची घटनास्थळी भेट


अपघातानंतर ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका (जीएचएमसी), एसडीआरएफ आणि पोलिसांचे अधिकारी रात्री उशिरा घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदत व बचावकार्य सुरू केले. ज्यानंतर ढिगाऱ्याखालून 9 मृतदेह बाहेर काढण्यात आले. अपघातानंतर हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसीही घटनास्थळी पोहोचले.


मुसळधार पाऊस


हैदराबादमध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे. बर्‍याच भागात गेल्या 24 तासांत सुमारे 25 सेमी पावसाची नोंद झाली आहे. पाऊस पडल्यानंतर अनेक भागात पाणी साचले आणि पावसाच्या पाण्यात वाहने वाहू लागली. रस्त्यावर नाल्यांसारखे पाणी वाहू लागले होते.



एसडीआरएफकडून बचावकार्य


पाऊस पडल्यानंतर शहरातील खालच्या भागातील घरांमध्ये पाणी शिरले. स्थानिक नागरिकांच्या मदतीसाठी एसडीआरएफ आणि अग्निशमन दलाचे पथक तैनात केले आहेत. एसडीआरएफची टीम शहरात बचावकार्य करत आहे. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले असून परिस्थितीचा अहवाल मागवला आहे.