रायगड : पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि डायमंड किंग नीरव मोदी याला राज्य सरकारनं जोरदार दणका मिळालाय. महाराष्ट्र सरकारनंही मुंबई उच्च न्यायालयात रायगड जिल्ह्यानजिक अलिबागमध्ये असलेला नीरव मोदीचा बंगला पाडल्याचं कोर्टासमोर म्हटंलय. सरकारच्या म्हणण्यानुसार, ५ डिसेंबर रोजी नीरव मोदीचा हा बंगला पाडण्यात आला. सरकारी वकील पी बी काकडे यांनी मुख्य न्यायाधीश नरेश पाटील आणि न्यायाधीश एम एस कर्णिक यांच्यासमोर सरकारची बाजू मांडली. सरकारनं या क्षेत्रातील जवळपास ५८ खाजगी संपत्ती हटवण्याची नोटीस दिल्याचं त्यांनी कोर्टात म्हटलंय. या सर्व संपत्तीच्या मालकांनी समुद्र क्षेत्रात संबंधित सरकारी नियमांचं उल्लंघन केलंय. हायकोर्टानं अलिबाग भागतील अवैध संपत्तीवर कारवाईबद्दल माहिती मागितली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलिबागच्या किहीम समुद्रकिनाऱ्या जवळ असलेला नीरव मोदीचा हा बंगला जवळपास ३० हजार चौरस फूट भागात पसरलाय. महसूल आणि सीआरझेड कायद्याचे उल्‍लंघन करून हे बांधकाम करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. 


नोटीस पाठवण्यात आलेल्या इतर ५८ संपत्तींना पुढच्या एका आठवड्यात हटवण्यात येईल, असंही सरकारकडून देण्यात आलेल्या शपथपत्रात म्हटलंय.