मुंबई : नीरव मोदीने दिलेल्या धक्क्यातून जनता सावरत असताना त्याच्या सावत्र भावाने आणखी एक धक्का दिला आहे. नीरव मोदीचा सावत्र भाऊ नेहल एका सेफहाऊसमधून ५० किलोग्रॅम सोने (ज्वेलरी) घेऊन गूढरित्या पसार झाला आहे. पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) धोका दिल्या प्रकरणी सीबीआयने नीरव मोदी विरूद्ध गुन्हा नोंदवल्याची माहिती मिळताच नेहल पसार झाल्याची चर्चा आहे. तपास अधिकाऱ्यांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहल जी ज्वेलरी घेऊन पळाला आहे ती, नीरवची एक रीटेल आउटलेट विकण्यासाठी ठेवण्यात आली होती.


नेहल याला होता संशय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएनबी घोटाळ्याचा भांडाफोड होताच नेहलला वाटले की, तपास यंत्रणा आपल्या मागावर दुबईपर्यंतही पोहोचू शकते. त्यामुळे त्याने ज्वेलरी घेऊन पोबारा करणे पसंद केले. दरम्यान, नेहल हा मेहुल चोक्सीची कंपनी गीतांजली जेम्ससोबत संबंध राखून होता. पीएनबी गोटाळ्यात सीबीआयने नेहलला आरोपी बनवले नाही. मात्र, सूत्रांकडील माहितीनुसार, इडीने या प्रकरणात नेहलची भूमिका महत्त्वाची असल्याचे म्हटले आहे.


नीरव मोदीचे कुटुंब भारतातून पळाले


ईडीद्वारे मुंबईत झालेल्या विशेष सुनावनीत गुरूवारी दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटमध्ये २४ आरोपींचा समावेश आहे. ज्यात नेहलच्या नावाचाही समावेश आहे. पीएनबी घोटाळा प्रकरणात पहिला गुन्हा दाखल होण्याच्या काही दिवस आगोदर नीरव मोदीचे संपूर्ण कुटुंब भारतातून पळाले. मात्र, नेहलला पीएनबीसोबत चर्चा करण्यासाठी पाठवण्यात आले. जेनेकरून त्याला उर्वरीत रकमेचे पुनर्गठण (रीपेमेंट) करण्यासाठी वेळ मिळेल, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.