मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२०-२१ चा अर्थसंकल्प मांडला. आज सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर कऱण्यास सुरुवात झाली. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा दुसरा अर्थसंकल्प होता. आर्थिक स्तरावर अनेक आव्हानांना सामोरं जाणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेसाठी, या अर्थसंकल्पातून अनेक तरतूदी करण्यात आल्या. अर्थसंकल्प २०२० मध्ये कृषी, ग्रामीण, शिक्षण, आरोग्य यांवर अधिक भर देण्यात आला आहे. 


अर्थसंकल्प २०२० मधील ठळक मुद्दे - 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- निफ्टी १८७ अंकांनी कोसळला


- अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेअर बाजार ५५० अंकांनी कोसळला


- १५ लाखांवरील उत्पन्नावर ३० टक्के टॅक्स


- १२.५० ते १५ लाखांपर्यंत २५ टक्के टॅक्स


- १० ते १२.५० लाखांपर्यंत २० टक्के टॅक्स


- ७.५ ते १० लाखांपर्यंत १५ टक्के टॅक्स


- ५ ते ७.५ लाखांवर १० टक्के टॅक्स


- ५ लाखांच्या उत्पन्नावर टॅक्स नाही


- १० टक्के आर्थिक विकासदर गाठण्याचं उद्दिष्ट


- एलआयसीमधील मोठी भागीदारी विकणार


- सरकारी बँकांसाठी ३ लाख ५० हजार कोटी रुपये


- काश्मीर, लडाख योजनांसाठी विशेष योजना


- जम्मू-काश्मीरसाठी ३२ हजार कोटी


- लडाख विकासासाठी ५ हजार ९०० कोटी


- कायद्यानुसार टॅक्स चार्टर लागू करणार


- करदात्यांची सरकार काळजी घेणार


- व्यापाऱ्यांच्या टॅक्सबाबत न्यायिक भूमिका


- टॅक्स चोरी करणाऱ्यांसाठी कडक कायदा


- कररचनेसंदर्भात क्लिष्ट कायदे सोपे करणार


- बँकेतील ग्राहकांच्या ठेवींच्या नुकसानभरपाईसाठी विम्याची मर्यादा एक लाखावरून पाच लाखांपर्यंत वाढवणार 



- महिलांच्या योजनेसाठी २८ हजार ६०० कोटी 


- झारखंडमध्ये आदिवासी संग्राहलय (ट्रायबर म्युझियम) उभारणार 


- ५ पुरातत्व केंद्रांचा विकास करणार



- सांस्कृतिक मंत्रालयासाठी ३ हजार १०० कोटी


- अनुसूचित जाती आणि मागासवर्गीय जातींच्या विकासासाठी ८५ हजार कोटीच्या निधीची तरतूद


- अनुसूचित जमातींच्या विकासासाठी ५३,७०० कोटीची तरतूद


- ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगासाठी ९५०० कोटींची तरतूद 



- बेटी बचाओ, बेटी पढाओचं राजकारण नको


- शाळांमध्ये मुलींची संख्या वाढली


- बेटी बचाओ, बेटी पढाओचा चांगला परिणाम


- ५५० रेल्वे स्टेशन वाय-फायशी जोडणार


- PPP मॉडेलवर नव्या १५० रेल्वेचा प्रस्ताव


- नदी काठांवरील शहरांसाठी अर्थगंगा योजना


मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम वेगाने पूर्ण करणार



- किनारी शहरातील व्यापारांसाठी अर्थगंगा योजना


- २७ हजार किलोमीटरवर गॅसग्रीडचा विस्तार


- इलेक्ट्रॉनिक मॅन्यूफॅक्चरिंग इंडस्ट्रीला प्रोत्साहन देण्यासाठी अर्थमंत्र्यांची नव्या योजनेची घोषणा, ५ वर्षात १०० लाख कोटींच्या गुंतवणुकीचं लक्ष्य  


- २००० किमीचा सागरी मार्ग तयार करणार


- २०१३ पर्यंत दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे पूर्ण होणार



- आरोग्य योजनांसाठी ७० हजार कोटींची मोठी घोषणा


- लोकांचं उत्पन्न वाढवण्यावर भर देऊन क्रयशक्ती वाढवण्याचा प्रयत्न करणार



- शिक्षण क्षेत्रासाठी ९९ हजार ३०० कोटी, कौशल्य विकासासाठी ३ हजार कोटी


 - नॅशनल पोलीस युनिव्हर्सिटी उभारणार, फॉरेन्सिक युनिव्हर्सिटीचा प्रस्ताव


- शिक्षणासाठी आणखी निधीची गरज, शिक्षण क्षेत्रात परदेशी गुंतवणूक आणणार, २०३० पर्यंत भारतात सर्वाधिक तरुण शिक्षित


- २०१४ पर्यंत सर्व जिल्ह्यात जनौषधी केंद्र


- आरोग्य क्षेत्रासाठी ६९ हजार कोटी


- स्वच्छ भारतासाठी १२ हजार ३०० कोटी


- महिला शेतकऱ्यांसाठी धन्य लक्ष्मी योजनेची घोषणा, याअंतर्गत महिलांना प्रामुख्याने बियाणांसंबंधी योजनांमध्ये जोडण्यात येईल.


- शेतीमधील नाशिवंत उत्पादनाच्या वेगवान वाहतुकीसाठी भारतीय रेल्वेच्या साहाय्याने किसान रेल्वे सुरु करणार


- 'टीबी हारेगा, देश जितेगा' अभियान हाती घेणार


- मत्स्यपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी पाऊल, सागर मित्र योजनेची सुरुवात करणार


- कृषीकर्जासाठी १५ लाख कोटींची तरतूद 


- शेतमालाच्या निर्यातीसाठी कृषी उडान योजना सुरु करणार


- २०२५ पर्यंत दूध उत्पादन दुप्पट करणार


- नापीक जमीनीवर सौर उर्जा प्रकल्प उभारणार 


- २० लाख शेतकऱ्यांसाठी सौग उर्जा योजना, कृषीपंपासाठी सौरउर्जेच्या वापरावर भर


- शेतकऱ्यांसाठी वेअरहाऊस उभारणार, शेतकऱ्यांना गोदामं उभारण्यासाठी योजना


- मेरा वतन, तेरा वतन, हमारा वतन... दुनिया का सबसे प्यारा वतन... निर्मला सीतारामन यांनी म्हटली कविता


- कृषी आणि पशुपालन क्षेत्रासाठी तीन नव्या कायद्यांची निर्मिती


- रासायनिक खतांच्या वापरांवर नियंत्रण ठेवणार; सेंद्रीय खतांच्या वापराला प्राधान्य देणार


- सरकार देशातील १०० दुष्काळी जिल्ह्यांसाठी खास कार्यक्रम, व्यापक उपाययोजना प्रस्तावित करणार



- शेतकरी कल्याणासाठी १६ सूत्री कार्यक्रम हाती घेणार


- मार्च २०१४ मध्ये केंद्र सरकारवर ५२.२% कर्जाचा बोजा. मार्च २०१९मध्ये हाच आकडा ४८.७ टक्क्यांनी कमी झाला आहे. 



- जीएसटीमुळे महिन्याला ४ टक्के बचत


- जीएसटीमुळे वाहतूक आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात कार्यक्षमता वाढली आहे, जीएसटीमुळे ग्राहकांना वार्षिक १ लाख कोटी रुपयांचा फायदा झाला आहे



- जीएसटीमुळे ट्रक, ट्रान्सपोर्टेशन २० टक्क्यांनी वाढलं. 


- आपल्या देशातील लोकांना चांगले उत्पन्न मिळवून देणारे रोजगार मिळाले पाहिजे


- यंदाचा अर्थसंकल्प देशाच्या आकांक्षा, आर्थिक विकास आणि समाज या तीन घटकांना डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आला आहे.


- १ एप्रिलपासन जीएसटीला नवीन स्वरुप देणार -  अर्थमंत्री


- दरवर्षी ६० लाख करदाते निर्माण होत आहेत -  अर्थमंत्री


- आर्थिक धोरणात मोठे बदल करत आहोत - अर्थमंत्री 


- अर्थमंत्र्यांकडून अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात


- संसद भवनात केंद्रीय कॅबिनेट बैठकीत अर्थसंकल्प २०२०ला मंजुरी


- अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचे कुटुंबिय आणि मुलगी परकला वाङ्‌मय संसदेत दाखल



- गृहमंत्री अमित शाह बैठकीसाठी संसदेत दाखल



- केंद्रीय अर्थसंकल्प २०२०-२१च्या छापील प्रती कडक सुरक्षतेत संसदेत आणल्या गेल्या आहेत. अर्थसंकल्पाच्या छापील प्रती संसद भवनात जाण्यापूर्वी त्याची तपासणी करण्यात येत आहे.





- पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठकीसाठी संसदेत दाखल



- १०.१५ वाजता कॅबिनेट बैठक, बैठकीसाठी निर्मला सीतारामण आणि अनुराग ठाकूर संसद भवनात दाखल



- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची अर्थसंकल्पाला मंजुरी


- अर्थमंत्री निर्मला सीतारामण आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर अर्थसंकल्पापूर्वी राष्ट्रपतींच्या भेटीला


- अर्थसंकल्प २०२० संसदेत सादर होण्यापूर्वी याचा परिणाम शेअर मार्केटवरही पाहायला मिळतो आहे. सेन्सेक्स ४० हजार ५७६ तर निफ्टी ११ हजार ९१० अंकांनी घसरला आहे. 



- अर्थमंत्री लाल रंगाच्या कापडात गुंडाळलेल्या 'बही खाता'सह मंत्रालयातून रवाना



- निर्मला सीतारामण अर्थसंकल्पावर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरी घेण्यासाठी अर्थ मंत्रालयातून राष्ट्रपती भवनकडे रवाना. त्यांच्यासोबत अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर आणि मंत्रालयातील काही अधिकारी उपस्थित




- अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी, 'मोदी सरकार सबका साथ सबका विकास या धोरणावर विश्वास ठेवते. हा अर्थसंकल्प देश आणि देशवासियांसाठी सर्वोत्तम राहण्यासाठी आमचा प्रयत्न असल्याचं' ते म्हणाले.



- अनुराग ठाकूर यांनी अर्थ मंत्रालयात पोहचण्यापूर्वी त्यांच्या निवासस्थानी हनुमान मंदिरात पूजा केली.



- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण सकाळी ८.३०च्या सुमारास अर्थ मंत्रालयात दाखल झाल्या.