सियाचीनमध्ये जवानांसोबत साजरा करणार संरक्षणमंत्री
संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण जम्मू काश्मीरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.
श्रीनगर : संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण जम्मू काश्मीरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.
आपल्या या दौऱ्यात त्या काश्मीर खोऱ्यातील नियंत्रण रेषा आणि लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) सुरक्षेच्या स्थितीचा आढावा घेणार आहेत.
यानंतर संरक्षणमंत्री सियाचीन किंवा ग्लेशीअर दौरा करणार आहेत. हे जगातील सर्वात उंचावरील युद्धक्षेत्र मानलं जातं. हवामानाची स्थिती चांगली असेल तर संरक्षणंत्री दसरा सियाचीनमधल्या जवानांसोबत साजरा करतील.
सूत्रांच्या माहितीनुसार, निर्मला सेनाप्रमुख जनरल बिपिन रावत आज सकाळीच काश्मीरमध्ये दाखल झाल्यात. यानंतर त्या तत्काळ उत्तर काश्मीरच्या कुपवाडा सेक्टरमध्ये गेल्या.
संरक्षणमंत्री म्हणून निर्मला सीतारमण यांचा जम्मू-काश्मीरचा हा पहिलाच दौरा आहे. राज्यपाल एन एन वोहरा आणि मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांचीही त्या भेट घेणार आहेत.