मुंबई : जगातील 10 सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या नावात रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या नावाचा समावेश होतो. श्रीमंतीचं दुसरं नाव म्हणजे अंबानी, अशीच त्यांची ओळख सांगितली जाते. हीच श्रीमंती राहणीमानातही झळकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महागडे कपडे, भव्य घर, आलिशान कार आणि बरंच काही, या साऱ्याची झलक अंबानींच्या दैनंदिन जीवनात पाहायला मिळते. इतकंच काय, तर त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्येही याची छटा दिसते.


सूत्रांच्या माहितीनुसार अंबानी यांची पत्नी, नीता अंबानी या जगातील सर्वात महागडं पाणी पितात. या पाण्याच्या एका घोटाची किंमत लाखोंमध्ये आहे असंही म्हटलं गेलं.


काही दिवसांपूर्वीच नीता अंबानी यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये त्या एका कलात्मक बाटलीतून पाणी पिताना दिसत आहेत.


नीता अंबानी यांचा फोटो व्हायरल झाला त्यावेळी या पाण्याची चर्चा झाली. ज्यानंतर त्या जगातील सर्वात महागडं पाणी पित असल्याची माहिती मिळाली.


नीता अंबानी या 750 मिलीच्या बाटलीतूनजे पाणी पितात, त्याची किंमत 60 हजार डॉलर इतकी आहे. भारतीय प्रमाणानुसार सांगावं तर,44 लाख रुपये इतकी या पाण्याची किंमत आहे असंही सांगण्यात आलं, पण पुढे जाऊन हा फोटो खोटा असल्याचं म्हटलं गेलं.


सर्वात महागडी पाण्याची बाटली...
जगातील सर्वात महागडं पाणी हे अतिशय खास पद्धतीचं आहे. हे सर्वसामान्य फिल्टर वॉटर नाही, तर हे अॅक्वा डीक्रिस्टलो ट्रिब्युटो ए नोडिग्लियनी या ब्रँडचं पाणी आहे.


ही पाण्याची बाटली सोन्याची आहे. या ब्रँडच्या सर्वात स्वस्त बाटलीची किंमत 285 डॉलर म्हणजेच 21 हजार 355 रुपये इतकी आहे. 2010 मध्ये या बाटलीची नोंद गिनीज बुकमध्ये करण्यात आली होती.


फक्त ही पाण्याची बाटलीच नव्हे, तर त्यातील पाणीही तितकंच खास आहे. या बाटलीमध्ये सोन्याची राख असल्याचं म्हटलं जातं. हे पाणी फ्रान्सचं असल्याचं सांगण्यात येतं.



असं म्हटलं जातं की, या पाण्यामध्ये 5 ग्रॅम सोन्याची राख मिसळली जाते. ज्याचे शरीराला भरपूर फायदे असतात. ज्यामुळेच या पाण्याची इतकी किंमत आहे.