नवी दिल्ली: इंधन दरवाढीमुळे संपूर्ण देश त्रस्त असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यावर काही उपाय सुचविले आहेत. इथेनॉल, मिथेनॉल हे पेट्रोलला पर्याय म्हणून पुढे येऊ शकतात. ऊसाचे साल, कॉटन, मका व तांदुळ यापासून इथेनॉल बनवता येते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामुळे पेट्रोल-डिझेलला पर्याय तर मिळेल. याशिवाय, 50 लाख रोजगारही निर्माण होतील. त्यामुळे आदिवासी आणि शेतकरी यांचीही प्रगती होईल, असा विश्वास नितीन गडकरींनी व्यक्त केला. 


देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. आज मुंबईत पेट्रोल २८ पैशांनी तर डिझेल २२ पैशांनी महागले. मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर ८८ रुपये ६७ पैसे इतका आहे. तर डिझेलचा प्रति लिटर दर ७७ रुपये ८२ पैसे इतका झाला आहे. दिल्लीत पेट्रोल ८१ रुपये २८ पैसे प्रति लिटर आहे. तर डिझेलचा दर ७३ रुपये ३० पैसे प्रति लिटर झाला आहे.