नवी दिल्ली : भारत सरकारने (Central Government) वाहनांसाठी एक नवीन सीरीज (New Vehicle series) जारी केली आहे. याचा मोठा फायदा अनेकांना होणार आहे. सरकारच्या या निर्णयाने लाखो लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जर तुम्ही एका अशा कंपनीत काम करता जेथे तुमची बदली राज्यात कुठेही होऊ शकते. तर तुम्हाला याचा मोठा फायदा होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र सरकारने नवीन वाहनांसाठी भारत सीरीज (bh series registration) सुरू केली आहे. नवीन सीरीजमधील वाहनांची नोंदणी संपूर्ण भारतात वैध असेल आणि या सीरीजमधील नोंदणी क्रमांकाच्या आधारे आपली गाडी देशाच्या कोणत्याही भागात बिनधास्तपणे वापरण्यास सक्षम असतील.


नवीन वाहनांसाठी भारत सीरीज


राज्यसभेत (Rajyasabha) एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी माहिती दिली की, नवीन वाहनांसाठी (New car Registration) नवीन नोंदणी चिन्ह भारत मालिका (बीएच-सीरीज) सुरू करण्यात आली आहे. या मालिकेमुळे वाहनांचे मालक एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरित झाल्यावर वाहनासाठी नवीन नोंदणीची गरज भासणार नाही.



नव्या मालिकेचा लाभ कोणाला मिळणार?


एका लेखी उत्तरात केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, नवीन मालिका ऐच्छिक तत्त्वावर उपलब्ध असेल आणि संरक्षण कर्मचारी, केंद्र सरकार आणि राज्य सरकारी कर्मचारी, केंद्र आणि राज्य सरकारी कंपन्यांचे कर्मचारी आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्या आणि संस्थांचे कर्मचारी या चार कंपन्यांसाठी उपलब्ध असतील. किंवा विविध राज्यांमध्ये अधिक कार्यालये असलेल्यांना भारत सीरीजचा लाभ मिळेल.


भारत सीरीजसाठी रोड टॅक्स कसा आकारला जाईल?


वाहनासाठी भारत सिरीज घेताना 2 वर्षांचा रोड टॅक्स भरावा लागेल. त्यानंतर दर 2 वर्षांनी रोड टॅक्स भरला जाईल. नोंदणीच्या तारखेपासून 14 व्या वर्षानंतर दरवर्षी कर लागू होईल, जरी त्याचा दर अर्धा असेल. 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या वाहनांवर 8 टक्के कर आकारला जाईल, तर 10 ते 20 लाख रुपयांच्या वाहनांना 10 टक्के कर, 20 लाखांपेक्षा जास्त वाहनांना 12 टक्के कर लागेल. डिझेल वाहनांना 2 टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जाईल, परंतु इलेक्ट्रिक वाहनांना 2 टक्के कर सवलत मिळेल.


अर्ज कसा करता येईल?


तुमच्याकडेही वर नमूद केलेली पात्रता असल्यास, तुम्ही तुमच्या कार्यालयाने जारी केलेल्या आयडीसह नवीन नोंदणीसाठी अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी, तुम्हाला रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाच्या वाहन पोर्टलवर जावे लागेल. तुम्ही भारत मालिकेसाठी डीलरद्वारे देखील अर्ज करू शकता. डीलरला तुमच्या वतीने फॉर्म 20 भरावा लागेल.  खाजगी क्षेत्रात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना फॉर्म 60 भरावा लागेल, ज्यामध्ये त्यांना रोजगाराशी संबंधित ओळखपत्र सादर करावे लागेल.