नवी दिल्ली : बिहारमधील राजकीय भूकंपामुळे देशभरातील राजकीय दिग्गजांना धक्का बसला आहे. या मागे  बिहारमध्ये सत्तेत असलेल्या दोन्ही पक्षांचे हे राजकीय डावपेच असल्याचं म्हटलं जात आहे. जेडीयू आणि आरजेडीची ही सुंदोपसुंदी असल्याचं म्हटलं जात आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि नीतीश कुमार यांच्यात अनेक दिवसांपासून खडाजंगी सुरू होती, पण याचा कुणालाही अंदाज नव्हता की नीतीश कुमार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेडीयूच्या काही नेत्यांनी म्हटलंय की, चारा घोटाळा आणि इतर प्रकरणांमुळे लालू यादव हे अडचणीत आहेत, अशावेळी भाजपशी सलगी करून, नीतीश कुमार यांना सत्तेतून बेदखल करण्याचा कट आरजेडीचा होता, मात्र याची खबर नीतीश कुमार यांना लागली आणि त्याआधीच नीतीश कुमार यांनी राजीनामा दिला, आणि आरजेडीचा बुमरँग झाला.


टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, स्वत: लालू प्रसाद यादव भाजपशी डील करून सत्ता बदल करण्याच्या तयारीत होते. जेडीयूच्या सुत्रानुसार नीतीश कुमार याआधीच आरजेडीच्या काही मंत्र्यांच्या वागणुकीवर नाराज होते. मात्र ही युती एवढ्या लवकर तुटली नसती, जर नीतीश कुमार यांना या गोष्टीची माहिती झाली नसती.