Bihar Political Crisis: बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बिहारच्या राजकारणासाठी आजचा रविवार सुपर संडे ठरु शकतो.रविवारी सकाळी ९च्या दरम्यान भाजपने महत्त्वाची बैठक बोलवली आहे. तर, जेडीयूने रविवारी सकाळी 10 वाजता विधानमंडळात बैठकीचे आयोजन केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार रविवारी संध्याकाळी वाजता 4 वाजता नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. शपथविधी सोहळ्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डादेखील उपस्थित राहू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारचा दिवसही बिहारच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा ठरला. शनिवारी आरजेडी आणि भाजप यांच्यात बैठक झाली. तर, भाजपच्या बैठकीनंतर प्रदेशअध्यक्ष सम्राट चौधरी यांनी सर्व आमदारांना सोमवारी संध्याकाळपर्यंत बिहारमध्येच थांबण्याचा आदेश दिला होता. तर, एकीकडे बिहार सचिवालयाची सुट्टीदेखील रद्द करण्यात आली होती. त्यामुळं येत्या दोन दिवसांत बिहारमध्ये राजकीय उलथापालथ होण्याचा अंदाज बांधला जात आहे. 


28 जानेवारी म्हणजेच सोमवारी सकाळी 10 वाजता जेडीयू विधानमंडळ गटाची बैठक आहे. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयात एनडीए विधानमंडळ दलाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर दुपारी 12 वाजता राज्यपालांची भेट घेऊन नीतीश कुमार त्यांचा राजीनामा देऊ शकतात. त्याचबरोबर एनडीएच्या आमदारांचे समर्थन असलेले पत्रदेखील राज्यपालांना सोपवण्यात येईल. त्यानंतर 4 वाजता शपथग्रहण होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 


नितीश कुमार नवव्यांदा मुख्यमंत्री


नितीश कुमार यांचा मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळावर एक नजर


- 3 मार्च 2000
- 24 नोव्हेंबर 2005
- 26 नोव्हेंबर 2010
- 22 फेब्रुवारी 2015
- 22 नोव्हेंबर 2015
- 27 जुलै 2017
- 16 नोव्हेंबर 2020
- 9 ऑगस्ट 2022 


नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर काय?


नीतीश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या साथीने पुन्हा एखदा सरकार बनवण्याचा दावा करणार. नव्या सरकारमध्ये नितीश कुमारच मुख्यमंत्री असतील तर, त्यांच्यासोबत भाजपचे दोन नेते मंत्रीपदाची शपथ घेतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश कुमार यांच्यासोबत आधीच्या सरकारमध्ये सहकारी असलेले सुशील मोदी आणि रेणू देवी यांच्याजवळ उपमुख्यमंत्रीपदाचा कारभार सोपवण्यात येईल. 


जागांचे गणित काय?


आरजेडीच्या आमदारांनी दिलेल्या माहितीनुसार महायुतीला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 8 आमदारांचे समर्थन गरजेचे आहे. विधानसभेसाठी 243 सदस्य आहेत. त्यातील 78 जेडीयू आणि भाजप 45 आमदार आहेत. ही एखूण संख्या 123 इतकी आहे. बहूमताचा आकडा गाठण्यासाठी 122 जागांची गरज आहे.