Nitish Kumar मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार का? नितीश कुमारांनीच दिलं उत्तर
नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्रीपद सोडणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. पण सत्य काय आहे?
पटना : नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्रीपद सोडणार आहेत का? अशी चर्चा सध्या सुरु आहे. नितीश कुमार हे राज्यसभेचे खासदार होणार आहेत. अशा बातम्या येत असताना आता नितीश कुमार (Nitish Kumar) यांनीच यावर इत्तर दिलं आहे. नितीश कुमार म्हणाले की, मला आश्चर्य वाटते की अशा खोट्या बातम्या कोण पसरवत आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना, तुम्ही मुख्यमंत्रीपद सोडणार आहात का, असे विचारले असता त्यांनी मीडियावर निशाणा साधला. मी स्वतः हे वाचून आश्चर्यचकित झालो. असं ते म्हणाले.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आता राज्यसभेवर जाण्याच्या बातम्या अफवा असल्याचे सांगत असले तरी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका निवेदनात म्हटले होते की, ते लोकसभा, विधानसभा आणि विधानसभेचे सदस्य राहिलेले आहेत. आता फक्त राज्यसभा बाकी आहे.'
मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची राज्यसभेवर जाण्याची इच्छा असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. नितीशकुमार यांना राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते, अशी चर्चाही सुरू होती. मात्र, राज्यसभेचे सदस्य न होण्याच्या नितीशकुमार यांच्या वक्तव्यानंतर बिहारच्या राजकारणात चर्चेचा बाजार तापला होता. विविध अंदाज बांधले जात होते. मात्र आज (सोमवारी) नितीश कुमार यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
नितीश कुमार हे राजीनामा देऊन राज्यसभेवर जातील. त्यानंतर राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होईल. जेडीयूला 2 उपमुख्यमंत्रीपद दिले जाईल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती.