पटणा : बिहारमध्ये राजकीय भूकंप झाल्यानंतर घडामोडीही झटपट घडत आहेत. लालूप्रसाद यादव यांच्याशी फारकत घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर भाजपनं नितीश कुमार यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे नितीश कुमार हे आता पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. उद्या संध्याकाळी पाच वाजता नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. भाजपनं नितीश कुमार यांना पाठिंबा दिला असला तरी भाजपचे कोणते आमदार शपथ घेतील याबाबत मात्र अजून माहिती मिळालेली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेत मॅजिक फिगर म्हणून १२२ सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे.  सध्या लालूंच्या राजदचे ८०, काँग्रेस २७, जेडीयूचे ७१ आणि भाजपचे ५३ आमदार आहेत. तसेच इतर चार आमदार आहे. भाजपसोबत गेल्यास जेडीयू ७१, भाजप ५३ आणि ४ अपक्ष असे मिळून १२८ आमदार होत आहेत. यामुळे बिहारमध्ये मॅजिक फिगरचा आकडा नितीश अगदी सहज पार करत आहेत.