नवी दिल्ली : भारतातील बीचवर भारतातील तसेच परदेशातील महिलांना बिकीनी घालता येणार नाही, अशा मार्गदर्शक सूचना केंद्रीय पर्यटन मंत्री के जे अल्फोन्स यांनी प्रसिध्द केल्या आहेत. 


काय म्हणाले मंत्री महोदय...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘परदेशात पर्यटक रस्त्यावर बिकीनी घालून फिरत असतात. पण, भारतात असं करता घेणार नाही. भारतात तुम्हाला बिकीनी घालून फिरता येणार नाही. भारतातील संस्कृतीप्रमाणेच वागणे योग्य असेल. लॅटीन अमेरिकेतील काही शहरात बिकीनी घालून फिरणे सामान्य असू शकतं, पण, भारतात तुम्ही परंपर आणि संस्कृतीचा मान ठेवला पाहिजे. मी असे म्हणत नाही की भारतात आल्यावर साडीच घाला. पण, भारतात मान्य होईल, असा ड्रेस तुम्ही घातला पहिजे’, असं के जे अल्फोन्स यांनी म्हटलं आहे.


मंत्र्यांच्या सूचनेवर प्रतिक्रियांचा पाऊस


केंद्रीय मंत्र्यांच्या या सूचनांवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. या सूचना भारतातील आणि परदेशातील पर्यटकांसाठी आहेत, असे अल्फोन्स म्हणाले. 


याआधी देखील सरकारवर काय खावे हे ठरवण्यावर टीका झाली आहे, त्यानंतर आता देशात कोणते कपडे परिधान करावेत याविषयी टीका होत आहे.