आगामी निवडणुकांमुळे गायब झाल्या 2000 च्या नोटा?
पाहा काय आहे यामागचं कारण
नवी दिल्ली : नोटबंदीला जवळपास दीड वर्ष होत आहेत. अनेक राज्यांमध्ये एटीएममध्ये नोटा नाहीत. त्यामुळे देशात अनेक ठिकाणी नोटबंदी सारखं वातावरण आहे. आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, बिहार, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये लोकांना एटीएममधून पैसे निघत नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे. सरकार आणि रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया डॅमेज कंट्रोल मोडमध्ये आहेत. कॅश क्रंचचं कारण लोकं मागचत आहेत. सरकारचं म्हणणं आहे की, नोटांच्या मागणीत वाढ झाली आहे. पण सरकारकडून याचं कोणतंही स्पष्ट कारण समोर आलेलं नाही. अनेक बँक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, 2000 च्या नोटा बँकांमध्ये परत नाही येत आहेत. अशी देखील अफवा आहे की, कर्नाटक निवडणुकांमध्ये कॅश होर्डिंगमुळे हे संकट उभं राहिलं आहे.
निवडणुकीसाठी पैसा होतोय जमा ?
सोशल मीडियावर अशा चर्चा आहेत की, आगामी निवडणुकीसाठी राजकीय पक्ष, नेते आणि कार्यकर्त्ये पैसा साठवून ठेवत आहेत. दोन हजारांची नोट सप्लाय बंद झाली आहे. निवडणुकीआधी कर्नाटकमध्ये नोटांची मागणी वाढवण्यासाठी आणि कॅश क्रंचबाबत सोशल मीडियावर चर्चा आहेत.
अचानक आली परिस्थिती?
देशात रोख रक्कम गायब झाल्य़ाने बँकिंग एक्सपर्ट यांचं मत आहे की, नोटांची छपाई आणि सप्लायबाबत काही अडचणी आहेत. पण हे इतकं मोठं कारण नाही वाटत. ज्यामुळे देशात अशी परिस्थिती निर्माण होईल. सूत्रांच्या माहितीनुसार पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि 2019 मध्ये देशात लोकसभा निवडणुका होणार आहेत. यामुळे नेते आणि पक्ष पैसा जमा करण्याच्या तयारीत लागले आहेत.
निवडणुकीच्या खर्चासाठी पैसा जमा
सूत्रांच्या माहिती नुसार, वर्षात रोख रक्कम आणि सप्लायबाबत अडचणी येऊ शकतात. पण कॅशलेससाठी इकोनॉमीला चालना देण्यासाठी कॅशचं सर्कुलेशन कमी करण्याची गोष्ट योग्य नाही वाटत. अशात निवडणुकीसाठी आधीच पैसा साठवला जातोय.