नवी दिल्ली : सिनेमा हॉलमध्ये राष्ट्रगीत गाण्याच्या प्रकरणाची सुनावणी करतांना सर्वोच्च न्यायालयाने मागील आदेशात कोणताही बदल करण्यास नकार दिला आहे. पण न्यायालयाने या आदेशात बदल करण्याचे देखील संकेत दिले आहेत.


एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, केंद्र सरकारने देशामध्ये कुठे राष्ट्रगीत व्हाव यासाठी एक पॉलिसी तयार करावी. सरकार का राष्ट्रगीतासाठी धोरण तयार करत नाही. असा सवाल देखील कोर्टाने केला. या प्रकरणात पुढील सुनावणी 9 जानेवारी रोजी होणार आहे.