No Cow Hug Day On February 14 Centre Withdraws Appeal: केंद्र सरकारने अंतर्गत येणाऱ्या पशू कल्याण बोर्डाने जारी केलेले Cow Hug Day संदर्भातील निर्देश मागे घेतले आहेत. 14 फेब्रुवारी रोजी गायींना अलिंगन द्या, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करा असं या आदेशामध्ये म्हटलं होतं. मात्र यावरुन वाद झाल्यानंतर हे आवाहन केंद्रातील मोदी सरकारनं मागे घेतलं. 


काय होती सूचना?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र सरकारच्या पशू कल्याण बोर्डाने Cow Hug Day साजरा करण्याचं आवाहन केलं होतं. 14 फेब्रुवारी रोजी Cow Hug Day साजरा करावा असं पशू कल्याण बोर्डाचं म्हणणं होतं. या दिवशी गायींना अलिंगन द्या. गायीप्रति कृतज्ञता व्यक्त करा असं सरकारने जारी केलेल्या आव्हानात म्हटलं होतं. गायीला मिठी मारल्याने भावनिक समृद्धी मिळेल आणि वैयक्तिक आनंद वाढेल असं या आवाहानामध्ये म्हटलं होतं. पशू कल्याण बोर्ड हे पशुसंवर्धन मंत्रालयाअंतर्गत येतं. भाजपाचे पुरुषोत्तम रुपाला या मंत्रालयाचे मंत्री आहेत.


अनेकांनी केला विरोध


मात्र पशू कल्याण बोर्डाने जारी केलेल्या या सूचनेसंदर्भात काहींनी विरोध नोंदवला. त्यानंतर आता केंद्राने या सूचना मागे घेतल्या आहेत. सरकारने केलेल्या या आव्हानानंतर सोशल मीडियावरही मिम्सची लाट आली होती. सोशल मीडियाबरोबरच प्रसारमाध्यमांसमोरही अनेक नेत्यांनी उघडपणे या सूचनेवरुन सरकारच्या विभागाची खिल्ली उडवल्याचं पहायला मिळालं होतं.


निर्देश मागे घेताना काय म्हटलं?


"संबंधित यंत्रणा आणि मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या निर्देशानुसार भारतीय पशू कल्याण बोर्डाने 14 फेब्रुवारी रोजी गायींना आलिंगन देण्यासंदर्भातील दिन साजरा करण्यासाठी जारी केलेलं आवाहन मागे घेण्यात आले आहे," असे पशू कल्याण बोर्डाचे सचिव एस. के. दत्ता यांनी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.



आव्हाड यांनी केलेली टीका


आव्हाड यांनी या सूचनेवरुन उपहासात्मक व्हिडीओ ट्वीट केला होता. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती गायीला मिठी मारण्याचा प्रयत्न करत असतानाच गाय या व्यक्तीला लाथ मारताना दिसत आहे. आव्हाड यांनी, "14 फेब्रुवारीला काऊ हग डेचा सराव" अशी कॅप्शन दिली आहे.



आव्हाड यांनी गायीला मिठी मारण्याच्या आवाहनावरुन टोला लगावताना गायीला नेमकी मिठी कशी आणि कुठून मारावी असा प्रश्न विचारला होता. तसेच गायीला मिठी मारण्याची प्रात्यक्षिकं सरकारने 24 तास आधी टीव्हीवर दाखवावीत अशं म्हटलं होतं.