`जवान शहीद होत असताना पाकिस्तानशी चर्चा नाही`
पाकिस्तानशी चर्चा करायला भारताने कधीही नकार दिलेला नाही.
नवी दिल्ली : पाकिस्तानशी चर्चा करायला भारताने कधीही नकार दिलेला नाही. मात्र सीमेवर जवान शहीद होत असताना पाकिस्तानशी चर्चा करणं संयुक्तिक होणार नाही अशी कठोर भूमिका भारताने घेतलीय. दहशतवाद आणि चर्चा एका वेळी होऊ शकत नाही अशा शब्दांत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला चपराक लगावलीय. पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकांनंतर नव्या सत्ताधाऱ्यांशी भारत चर्चा करणार का, असा प्रश्न सुषमा यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी भारताची भूमिका स्पष्ट केलीय.