नवी दिल्ली : दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं गाड्यांच्या इन्श्यूरन्सच्या नूतनीकरणाबाबत नवे नियम लागू केले आहेत. वाहनांचं पीयूसी नसेल तर इन्श्यूरन्सचं नूतनीकरण करता येणार नाही, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. 


पीयूसी नसलेल्या वाहनांच्या इन्श्यूरन्स पॉलीसीचं नूतनीकरण करू नका असे आदेश सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मदन बी लोकूर यांच्या समितीनं वाहन इन्श्यूरन्स कंपन्यांना दिले आहेत. याचबरोबर पीयूसी केंद्रासाठी ऑल इंडिया रियल टाईम ऑनलाईन प्रणाली सुरु करायलाही न्यायालयानं सांगितलं आहे.