नवी दिल्ली : विदेशातून खेळणी मागवणे यापुढे भलतेच कठीण होणार आहे. विदेशातून खेळणी मागविण्याबाबत असलेले नियम सरकारने अधिकच कडक केले आहेत. देशी खेळण्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी सरकारने हे धोरण स्विकारले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डायरेक्टर ट्रेडकडून १ सप्टेंबरला जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार यापुढे केवळ भारतीय मानक ब्यूरोने (बीआयएस) ठरवून दिलेल्या नियम आणि अटींची पूर्तता केलेलीच खेळणी भारतात आयात होतील. विशेषकरून इलेक्ट्रिक खेळणी, स्लाईड्स, झोपाळे आणि इतर अॅक्टीव्हीटी असणाऱ्या खेळण्यांवर विशेष नियम लावण्यात आले आहेत. बीआयएसने ठरवून दिलेल्या नियमांनुसार ही खेळणी फिजीकल, मेकॅनिकल प्रापर्टी, केमिकल कंटेंट, ज्वलनशीलता आदी कसोट्यांवर खरी ठरायला हवीत त्यानंतरच या खेळण्यांचा भारतातील प्रवेश नक्की होईल.


विदेशातून भारतात आयात होणाऱ्या खेळण्यांची तपासणी करण्यासाठी विशेष लॅबचीही निर्मिती केली जाणार आहे. दरम्यान, गणेशोत्सवानंतर भारतात विविध सण उत्सव सुरू होतात. अशा वेळी खेळणी बाजारपेठेत मोठा उत्साह असतो. मात्र, सरकारी धोरणामुळे या क्षेत्राला यंदा फटका बसण्याची चिन्हे आहेत. परंतु, सरकारच्या धोरणामुळे भारतीय खेळणी उत्पादकांना चालना मिळू शकते.