नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा आलेख सतत विक्रम मोडत चालला आहे. आतापर्यंत भारतात एकूण रूग्णांची संख्या २२ लाखांच्या वर गेली आहे. देशभरात सक्रिय रूग्णांची संख्या जवळपास 6 लाख 84 हजारांच्या जवळपास आहे. गेल्या 24 तासात कोरोनामुळे जवळपास 900 लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे एकूण मृतांचा आकडा 44 हजारांच्या वर गेला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान कोरोनाचे केंद्र बनत आहे. मुख्यमंत्री निवासस्थानामध्ये आतापर्यंत सुमारे 100 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि त्यांच्या कुटुंबीयांची दोनदा कोरोना चाचणी झाली आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या आकडेवारीनुसार मिझोरम हे देशातील एकमेव राज्य आहे. जिथे कोरोनामुळे एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. मिझोराममध्ये आतापर्यंत कोरोनाचे 608 रुग्ण समोर आले असून 298 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.


जगातही कोरोनाचा कहर थांबत नाहीये. रुग्णांची संख्या जवळपास 2 कोटीपर्यंत पोहोचली आहे. लवकरच हा आकडा 2 कोटींच्या पुढे जाईल. त्याचबरोबर जगातील 213 देशांमध्ये कोरोनामुळे 7 लाख 30 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.


अमेरिकेत कोरोना रूग्णांची संख्या 51.5 लाखांवर गेली आहे. त्याच वेळी, ब्राझीलमध्ये कोरोना रूग्णांची संख्या 30 लाखांवर गेली आहे. युरोपमध्ये पुन्हा एकदा कोरोना संक्रमणाच्या संख्येत वाढ दिसून येत आहे. गेल्या 24 तासांत येथे सुमारे 23 हजार नवीन रुग्ण वाढले आहेत.  रशिया आणि स्पेनमध्ये सर्वाधिक प्रकरणे आहेत. दरम्यान, न्यूझीलंडला कोरोनामुक्त होऊन शंभर दिवस पूर्ण झाले आहेत.