मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर लगेचच नोबेल पारितोषिक विजेते अभिजीत बॅनर्जी यांनी या खास भेटीविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांची (पंतप्रधान मोदींची) भेट घेण्याची संधी मिळणं ही अत्यंत मोठी बाब असल्याचं सांगत भारताविषयी विचार करण्याची त्यांची पद्धत ही जरा वेगळी आहे, असंही ते म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माध्यमांविषयी पंतप्रधान नेमका कोणता आणि कसा विचार करतात याविषयी सांगत, त्यांनी या भेटीदरम्यान गप्पांची सुरुवातच माध्यमांविषयी एक विनोद करत केली, असं ते म्हणाले. मोदीविरोधक असल्याच्या सापळ्यात प्रसारमाघ्यमं कशा प्रकारे मला अडकवण्याच्या प्रयत्नांत आहेत याविषयी त्यांनी कोपरखळी मारल्याचं बॅनर्जींनी सांगितलं. 'तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, हे ते चांगलंच जाणतात' असं म्हणत माध्यमांप्रतीच्या भूमिकेविषयी पंतप्रधान सजग असल्याचंही बॅनर्जी म्हणाले. 



देशाविषयीचे त्यांचे विचार... 


'पंतप्रधांनाची भेट घेणं ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. त्यांनीही मला त्यांच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ दिला. मुळात भारताविषयी विचार करण्याची त्यांची पद्धत ही अतिशय वेगळी आणि चौकटीबाहेरची आहे', असं ते म्हणाले. विविध योजनांमागे असणाऱ्या मोदींच्या विचारशक्तीविषयीसुद्झा बॅनर्जी यांनी वक्तव्य केलं. 



मोदींच्या निवासस्थानीच झालेया या भेटीनंतर खुद पंतप्रधानांनीसुद्धा या भेटीविषयीचं एक ट्विट केलं. बॅनर्जी यांच्या कार्याची प्रशंसा करत भारताला त्यांचा अभिमान आहे, अशीही भावना व्यक्त करत मोदींनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.