नोएडा गॅंगरेप : महिलेने रागाच्या भरात केली चुकीची तक्रार
चालत्या कारमध्ये आपल्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार दाखल करणाऱ्या महिलेने काही तासातच आपला जबाब फिरवला आहे. रागाच्या भरात आपण चुकीची तक्रार केल्याचे या महिलेने म्हटले आहे.
नोएडा : चालत्या कारमध्ये आपल्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार दाखल करणाऱ्या महिलेने काही तासातच आपला जबाब फिरवला आहे. रागाच्या भरात आपण चुकीची तक्रार केल्याचे या महिलेने म्हटले आहे.
या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार सेक्टर ३९ पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हा नोंद झाल्यावर पोलिसांनी तपास सुरू केला. दरम्यान, आपण रागाच्या भरात चुकीची तक्रार दिल्याचे या महिलेचे म्हणने आहे. तक्रारदार महिलेने पोलिसांकडे तसा लेखी खुलासाही केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, ही महिला खरेच सांगते आहे की, कोणाच्या दबावाला बळी पडून तिने आपला जबाब बदलला आहे, या बाबत पोलीस तपास करत आहेत. तक्रारदार महिलेने रात्री उशीरा २ वाजून ३० मिनीटांच्या दरम्यान भादंवि कलम ३७६ अन्वये पोलिसांकडे तक्रार दिली होती.