नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा संपूर्ण देशाला मान खाली घालायला लावणारी एक घटना घडलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोएडाच्या गोल्फ कोर्स मेट्रो स्टेशनबाहेर उभ्या असलेल्या एका तरुणीला जबरदस्तीनं आपल्या गाडीत बसवून तिच्यावर चालत्या गाडीत अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आलीय. 


मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी शुक्रवारी रात्री गोल्फ कोर्स मेट्रो स्टेशनबाहेर उभी राहून आपल्या मैत्रिणीची वाट पाहत होती. या दरम्यान तिच्याजवळ एक स्कॉर्पिओ गाडी येऊन थांबली... तिला काही समजेपर्यंत गाडीतील दोन तरुण खाली उतरले आणि त्यांनी तरुणीला गाडीत कोंबलं.


अपहरणानंतर चालत्या गाडीत तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिला अक्षरधामजवळ गाडीतून खाली फेकून देऊन या नराधमांनी पळ काढळा. 


यानंतर तरुणीनं नोएडा सेक्टर ३९ पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. पोलिस आरोपी तरुणांचा शोध घेत आहेत.