Noida Post Mortem House News : नोएडातल्या पोस्टमॉर्टेम हाऊसमधला (Post Mortem House) एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरुन संताप व्यक्त होत आहे. या व्हिडिओत शवागृहात मृतदेहांच्या (Dead Body) मध्ये एक व्यक्ती एका महिलेबरोबर अश्लिल चाळे करताना दिसत आहे. एका व्यक्तीने हे अश्लिल चाळे (Viral Video) आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शवागृहात अश्लिल चाळे करणारा हा व्यक्ती तिथलाच सफाई कामगार आहे. हा सफाई कामगार बाहेरच्या एका महिलेला शवागृहात घेऊन आला होता. शवागृहात तिच्याबरोबर तो अश्लिल चाळे करत होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोस्टमॉर्टेम हाऊसच्या अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेत तपास सुरु केला आहे आणि कारवाईचे आदेश दिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
शवागृहाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोस्टमॉर्टेम हाऊसच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. शवागृहातील मृतदेहांची हेळसांड केली जात आहे का असा सवालही विचारला जात आहे. मृतदेहांशी संबंधित पुरावे मिटवण्याचा प्रयत्नही केला जात असावा अशी शक्यताही वर्तवली जात आहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी एफआयआर दाखल करत सफाई कामगाराला अटक केली आहे. या प्रकरणी आणखी लोकांचा तपास सुरु आहे. व्हिडिओत शवागृहात एक व्यक्ती महिलेबरोबर अश्लिल चाळे करताना स्पष्ट दिसत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. 


मित्र बनवत होता व्हिडिओ?
शवागृहातील या प्रकराचा व्हिडिओ एक व्यक्ती बनवत होता. व्हिडिओत एका स्ट्रेचरवर मृतदेह देखील दिसत आहे. यामुळे घटनेचं गांभीर्य आणखी वाढलं आहे. या घटनेमुळे सुरक्षेची पोलखोल तर झालीच, पण आजूबाजूला मृतदेह असताना असे प्रकार करण्याची विकृत मानसिकताही समोर आली आहे. व्हिडिओ घेणारा व्यक्ती हा सफाई कामगाराच मित्र असल्याचं बोललं जात आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ नोएडा सेक्टर 94 इथल्या पोस्टमॉर्टेम हाऊसमधला आहे. आरोपी हा याच शवागृहात काम करतो. तर त्याच्याबरोबर असणारी महिला ही त्याची गर्लफ्रेंड आहे आणि तिला तो शवागृहात घेऊन आला होता, अशी माहिती मिळतेय.


दररोज पाच ते सहा मृतदेहांचं पोस्टमॉर्टेम
नोएडा सेक्टर-94 मध्ये असलेलं या पोस्टमॉर्टेम हाऊसमध्ये दररोज पाच ते सहा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी येतात. या शवागृहाबाहेर 24 तास सुरक्षा रक्षक तैनात असतात. असं असतानाही सफाई कामगार महिलेला घेऊन आत गेलाच कसा असा प्रश्न विचारला जात आहे. सुरक्षा रक्षकांनीही या सफाई कामगाराशी हातमिळवणी केली आहे का याचा तपास केला जात आहे.