मुंबई : Noida Twin Towers Demolition Case: आता एक मोठी बातमी. आकाशाला गवसणी घालणारे हे दोन टॉवर होणार जमीनदोस्त करण्यात येणार आहे. या टॉवरवर बुलडोझर फिरविण्याची वेळ का आली, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. दरम्यान, जेव्हा हे ट्विन टॉवर पाडले जातील, तेव्हा नोएडा एक्सप्रेसवे देखील काही काळासाठी बंद ठेवला जाणार आहे. वाहतूक पोलिसांनी हेल्पलाइन क्रमांकही जारी केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. वाहतूक कोंडीची परिस्थिती हाताळण्यासाठी सहा क्रेन आणि मोठ्या संख्येने वाहतूक पोलीस एक्सप्रेसवेवर तैनात करण्यात येणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशातील नोएडा येथे सुपरटेकचे दोन बेकायदेशीर टॉवर 28 ऑगस्ट रोजी दुपारी 2.30 वाजता पाडण्यात येणार आहेत. नोएडा पोलिसांनी 103 मीटर उंच इमारती पाडण्यापूर्वी 26 ते 31 ऑगस्ट दरम्यान, आकाशात ड्रोनच्या वापरावर बंदी घातली आहे. 


तुम्हाला जगातील अशा इमारतींबद्दल बोलायचे झाले तर आकाशाला गवसणी घालणारे जे टॉवर किंवा इमारती होत्या त्या आज जगात अस्तित्वात नाहीत. एकेकाळी या इमारतींचा बोलबाला होता. 


ड्यूश बँक बिल्डिंग, न्यूयॉर्क


ही इमारत अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या जागेच्या दुसऱ्या बाजूला होती. ही 39 मजली इमारत 2007 ते 2011 दरम्यान पाडण्यात आली होती. 9/11 च्या प्राणघातक हल्ल्याच्या दशकानंतर, ही बिल्डिंग पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आली. 


सिंगर बिल्डिंग, न्यूयॉर्क


1960 मध्ये, सिंगर बिल्डिंग ही न्यूयॉर्क शहरातील सर्वात उंच इमारतींपैकी एक होती. ही इमारत 1968 साली पाडण्यात आली. इमारतीचा शेवटचा भाग 1969 च्या सुरुवातीला उखडून टाकण्यात आला.



मॉरिसन हॉटेल, शिकागो


1965 मध्ये, शिकागोमधील मॉरिसन हॉटेल फर्स्ट नॅशनल बँक बिल्डिंग (आता चेस टॉवर) बांधण्यासाठी तोडण्यात आले. ही 160 मीटर उंच इमारत जगातील पहिली इमारत होती जी पाडली गेली. 


आकाशाला गवसणी घालणारे हे दोन टॉवर होणार जमीनदोस्त.... बुलडोझर फिरविण्याची का आली वेळ? 


270, पार्क अव्हेन्यू, न्यू यॉर्क


270 पार्क अव्हेन्यू ही न्यूयॉर्क शहराच्या मिडटाउन मॅनहॅटन शेजारील एक गगनचुंबी इमारत होती. त्याच्यापेक्षा दुप्पट उंच इमारत बनवता यावी म्हणून ही इमारत पाडण्यात आली. इमारत पाडण्याचे काम 2021 च्या मध्यात पूर्ण झाले.


मिना प्लाझा, अबु धाबी


अबुधाबीमध्ये 541.44 फूट उंच इमारत पाडण्यासाठी केवळ 10 सेकंद लागले. एका व्हिडिओमध्ये 4 टॉवर आणि 144 मजले असलेला मीना प्लाझा काही सेकंदात मातीच्या ढिगाऱ्यात दिसून आला.


UIC बिल्डिंग, सिंगापूर


सिंगापूरची युनायटेड इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन लिमिटेड बिल्डिंग (UIC) 1973 मध्ये पूर्ण झाली, तेव्हा दक्षिण पूर्व आशियातील सर्वात उंच इमारतींपैकी एक होती. ही 40 मजली इमारत 2013 मध्ये पाडण्यात आली होती. 


AXA टॉवर, सिंगापूर  


AXA टॉवर ही 234.7 मीटर उंचीसह सिंगापूर शहरातील 16 वी सर्वात उंच गगनचुंबी इमारत आहे. आता ही इमारत जमीनदोस्त करण्यात येणार आहे. त्यामुळे हा टॉवर मे 2022 पासून जनतेसाठी बंद करण्यात आला आहे.