नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या १३,००० कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपी, हिरा व्यापारी नीरव मोदी आणि त्याचा काका मेहुल चोक्सी याच्या विरोधात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरन्ट प्रसिद्ध केलं आहे.


हाँगकाँगमध्ये लपल्याची शक्यता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) कर्जघोटाळा करून नीरव मोदी- मेहुल चोक्सी देश सोडून विदेशात पसार झाले आहेत. नीरव मोदी हा हाँगकाँगमध्ये लपल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



मोदी आणि चोक्सीच्या अडचणीत वाढ


आता न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरन्ट प्रसिद्ध करण्यात आल्याने नीरव मोदी आणि चोक्सी या दोघांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे.


भारतात आणण्यासाठी प्रयत्न


नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या दोघांना याआधी सीबीआयने नोटीसही पाठवली होती. नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांना भारतात आणण्यासाठी सीबीआय सातत्याने प्रयत्न करत आहे.