नवी दिल्ली : पेन्शनधारकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. अन्यथा तुमच्या बँक अकाऊंटमध्ये येणारी रक्कम थांबवण्यात येईल.


SBIने दिला आदेश


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुमचं पेन्शन अकाऊंट एसबीआय (SBI)मध्ये आहे तर तुम्हाला एक प्रमाणपत्र बँकेत जमा करावं लागणार आहे. जर तुम्ही हे प्रमाणपत्र बँकेत जमा नाही केलं तर तुमचं नुकसान होऊ शकतं.


लाईफ सर्टीफिकेट करावं जमा


एसबीआय बँकेने आपल्या बँकेत पेन्शनधारकांना लाईफ सर्टीफिकेट जमा करण्यास सांगितलं आहे. जर हे सर्टिफिकेट जमा केलं नाही तर पेन्शनधारक आपल्या अकाऊंटमधून पैसे काढू शकणार नाहीत. नोव्हेंबर महिना संपत आला आहे. त्यामुळे महिना अखेरपर्यंत पेन्शनधारकांना आपलं लाईफ सर्टीफिकेट जमा करावं लागणार आहे.


बँकेत ३६ लाख पेन्शन अकाऊंट


SBI देशातील सर्वात मोठी बँक आहे आणि देशभरातील सर्वाधीक पेन्शन अकाऊंट याच बँकेत आहेत. बँकेच्या मते, त्यांच्याकडे जवळपास ३६ लाख पेन्शन अकाऊंट्स आहेत आणि १४ सेंट्रलाइज्ड पेन्शन प्रोसेसिंग सेलही आहे.


ट्विटरवरुन दिली माहिती


SBIने ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे की, नोव्हेंबर महिन्यात पेन्शनधारकांनी आपलं लाईफ सर्टिफिकेट जमा नाही केलं तर, नोव्हेंबरनंतर त्यांची पेन्शन थांबवण्यात येईल.



काय आहे नियम


नियमांनुसार, नोव्हेंबरमध्ये सर्व पेन्शनधारकांनी आपलं लाईफ सर्टीफिकेट जमा करणं गरजेचं असतं. केवळ SBIच्या पेन्शनधारकांसाठी हा नियम लागु नाहीये तर, इतरही बँकेच्या पेन्शनधारकांना हा नियम लागू आहे.