North Sentinel Island Andaman Islands Tribe : जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने आपण भारतात असलेल्या सर्वात रहस्यमयी आदिवासी जमातीबद्दल जाणून घेऊया. अंदमान निकोबारमधील नॉर्थ सेंटीनल बेट हे संपूर्ण जगासाठी रहस्य आहे. या बेटावर राहणाऱ्या विशिष्ट आदीवासी जमातीतील लोक संपूर्ण जगापासून अलिप्त  राहतात. हे आदिवासी कुणाच्याच संपर्कात येत नाहीत आणि यांच्या संपर्कात कुणी आले तर ते परत येत नाहीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या जमातीतील लोक संपूर्ण जगापासून दूर आहे. जगाचा यांचा काहीच संबध नाही. हे कुणाच्याच संपर्कात येत नाहीत. कुणी यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर ते त्याचा खात्मा करतात. रहस्यमयी बेटावरील लोक जगाला का घाबरतात? याचा उलगडा झाला आहे. 145 वर्ष जिन्या या रहस्याचा थेट इंग्रजांशी संबध आहे.     


अमेरिकन नागरिकाच्या हत्येमुळे चर्चेत आलं  सेंटीनल बेट   


अमेरिकन नागरिकाच्या हत्येमुळे भारताची अंदमान निकोबार बेटं चर्चेत आली. काही वर्षांपूर्वी अंदमानमध्ये आदिवासींना ख्रिस्ती धर्माच्या जाळ्यात ओढण्यासाठी आलेल्या अमेरिकन नागरिकाची हत्या करण्यात आली. यानंतर त्याचा मृतदेह पुरून टाकला अशी चर्चा रंगली होती. अंदमान आणि निकोबार बेटसमुहातील नॉर्थ सेंटिनल द्वीप जितकं शांत आणि सुंदर  तेवढचं खतरनाक आहे. नॉर्थ सेंटीनल बेटं निसर्ग सौंदर्यामुळे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतात.  पण या बेटांवर जाण्यास संपूर्णपणे बंदी आहे. असं म्हटलं जातं या द्वीपांवर जो गेला तो परतलाच नाही.  असंच काहीसं  27 वर्षाीय अमेरिकन नागरिक जॉन अॅलनसोबत घडलं होत. ख्रिस्ती धर्माच्या प्रचारासाठी जॉन अॅलन या बेटावरील आदिवासींना भेटण्यासाठी गेला. त्याचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाला. त्यामुळे 5 मच्छिमारांसह तो पुन्हा या बेटांवर पोहोचला. जॉनने आदिवासींसाठी काही भेटवस्तूही नेल्या होत्या.  मात्र, इथल्या आदिवासींनी बाण मारून जॉनला ठार केले.  त्यानंतर आदिवासींनी त्याचा मृतदेह समुद्र किनारी वाळूत पुरून टाकला अशी माहिती समोर आली. 


सेंटीनल  बेटांवर जाण्याआधी जॉनने आपल्या परिवारासाठी एक चिट्ठी लिहीली होती. मी वेडा आहे असा तुमचा समज होऊ शकतो. पण इथल्या लोकांना जीजसबाबत सांगणं गैर होणार नाही असं मला वाटतं. मला ठार केलं तर आदिवांसींवर राग काढू नका, पण हे देवा मी मरू इच्छित नाही. 


नेमकं कुठ आहे हे बेट?


नॉर्थ सेंटीनल बेटं राजधानी पोर्ट ब्लेअरपासून 50 किलोमीटर दूर आहेत. या बेटांवर राहणाऱ्या आदिवासींना सेंटीनल आदिवासी म्हटलं जातं. आजवर या आदिवासींचा इतर कोणत्याही मानवी समुहांशी संपर्क आलेला नाही. या बेटांवर केवळ 100 आदिवासी राहतात असं म्हटलं जातं. यातल्या कोणाचाही इतर जगाशी आयुष्यात संबंध आलेला नाही. या बेटावर जाण्यास सर्वांनाच मनाई आहे. या बेटावरील आदिवासींवर कोणताही खटला भरता येत नाही. सेंटीनल आदिवासींना लॉस्ट ट्राईब हा दर्जा देण्यात आलाय. 2004 साली आलेल्या सुनामीनंतरही या आदिवासींच्या मदतीसाठी कोस्ट गार्डची हेलिकॉप्टर्स गेली. पण आदिवासींनी या हेलिकॉप्टर्सवर बाणांचा अक्षरशः पाऊस पाडला. \


सेंटीनल बेटंवरील आदिवासी जगाला का घाबरतात?


सेंटीनल बेटंवरील आदिवासी जगाला का घाबरतात याचा संबध थेट इंगर्जांशी जोडला जातो. हे 145 वर्ष जुन रहस्य आहे. 1879 मध्ये, ब्रिटीश नौदल अधिकारी मॉरिस विडाल पोर्टमन यांना अंदमानचे प्रभारी अधिकारी बनवण्यात आले. 1880 मध्ये त्यांनी या बेटावरील काही लोकांना प्रयोगासाठी नेले. मात्र, हे लोकल बेटावर परतल्यानंतर एका विशिश्ट प्रकारचा संसर्ग बेटावर पसरला. यामुळे बेटावरील लोकांचा मृत्यू होऊ लागला. यामुळे बेटावरील आदिवासी भयभित झाले आणि त्यांनी संपूर्ण जगाशी संपर्क तोडला. बाहेरील जगाने यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास ते त्यांच्यावर हल्ला करतात.