चलानच्या भीतीने गाडीत कंडोम घेऊन फिरतायत कॅब ड्रायव्हर
विशेष दिल्ली पोलीस आयुक्त ताज हसन यांनी शनिवारी या नियमा मागची सत्यता सांगितली.
नवी दिल्ली : दिल्लीतील कॅब ड्रायव्हर चलान कापण्याच्या भीतीने फस्ट एड बॉक्समध्ये कंडोममध्ये घेऊन फिरत आहेत. कंडोम न ठेवल्यास आमच्याकडून चलान कापले जाते असे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान विशेष दिल्ली पोलीस आयुक्त ताज हसन यांनी शनिवारी या नियमा मागची सत्यता सांगितली.
न्यूज एजंसी एएनआयने अनेक कॅब चालकांना या विषयावर प्रश चर्चा केली. फस्ट एड किट्समध्ये चलान ठेवण्याण्यासंदर्भात त्यांनी यावेळी सांगितले. फस्ट एड बॉक्समध्ये कंडोम न ठेवल्यास पोलीस चलान कापते असे त्यांनी यावेळी सांगितले. कॅबमध्ये कंडोम ठेवण्यामागचे कारण आम्ही कधी पोलिसांना विचारले नाही. पण असे न केल्यास पोलीस चलान कापते असे ड्रायव्हर कमलेश यांनी म्हटले.
याप्रकरणी माझे एकदा चलान कापल्याचा दावा कॅब ड्रायव्हर रमेश कुमारने केला आहे. जयपूर येथील पोलीस कर्मचाऱ्याने फस्ट एड बॉक्समध्ये कंडोम नसल्याने माझ्याकडून चलान कापल्याचे रमेश कुमार म्हणाला. मी फस्ट एड बॉक्समध्ये कंडोम ठेवतो. अपघात झाल्यास काही काळ कंडोममुळे रक्त प्रवाह रोखला जातो असे ड्रायव्हर अजयने एएनआयशी बोलताना म्हटले. पण चेकींग दरम्यान कोणी मला फस्ट एड बॉक्समधील कंडोम दाखविण्यास सांगितले नसल्याचेही त्याने स्पष्ट केले.
पोलिसांचा नकार
या प्रकरणानंतर स्पेशल पोलीस कमिशनर (ट्राफीक) ताज हसन यांना स्पष्टीकरण विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी असे काही मान्य करण्यास नकार दिला. मोटर व्हिकल एक्टमध्ये कंडोम संदर्भात असा कोणताही कायदा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फस्ट एड बॉक्समध्ये कंडोम नसल्यास आम्ही चलान कापत नसल्याचेही त्यांनी म्हटले.