12 नंतर एक नाही 11 वाजतात... भारतातील `या` गावात मध्यरात्रीनंतर उलट्या दिशेने फिरतात घड्याळाचे काटे
भारतातील एका गावात अनोखे घड्याळ आहे. या घड्याळाचे काटे उलट दिशेने फिरतात.
Gondwana Times The Anticlockwise Clock : संपूर्ण जग हे घडाळ्याच्या काट्यावर चालते. जर वेळ इकडची तिकडे झाली की गोंधळ होतो. 12 ते 1 असे घड्याचे काटे फिरतात. मात्र, 12 नंतर 11 वाजतात असे कुणी तुम्हाला सांगितले तर विश्वास बसणार नाही. पण, भारतातील एका गावात असे घड्याळ ज्याचे काटे उलट्या दिशेने फिरतात. म्हणजेच या घड्याळ्यात रात्री 12 वाजल्यानंतर एक नव्हे तर 11 वाजतात. जाणून घेऊया या आश्चर्यकारक घड्याळाविषयी.
हे देखील वाचा... महाराष्ट्रात आहे भारतातील सर्वात श्रीमंत गाव; इथं राहतात 60 करोडपती; इतकी कमाई करतात, यांचा व्यवयास काय?
जगभरात विविध प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण घड्याळे पहायला मिळतात. मात्र, छत्तीसगडमधील एका गावातील एक अनोखे घड्याळ आहे. हे घड्याळ पाहणाऱ्याला गोंधळात टाकते. या गावाच्या प्रथेनुसार येथे घड्याळाचे काटे उलट्या दिशेने फिरतात. एवढेच नव्हे तर येथे रात्री 12 वाजल्यानंतर एक नव्हे तर 11 वाजतात. या गावातील घड्याळ अँटी क्लॉकवाइज चालतात(Gondwana Times The Anticlockwise Clock).
हे देखील वाचा... अथांग समुद्र नाही तरीही इथं फिरताना येतो चौपाटीचा फिल! महाराष्ट्रातील एकमेव पर्यटन स्थळ
या प्रथेच पालन करणारे गोंड आदिवासी समुदायाचे लोक आपलेच घड्याळ योग्यप्रकारे चालत असल्याचे सांगतात. या समुदायाने स्वतःच्या घड्याळाला नावही दिले आहे. हे घड्याळ गेंडवाना टाइम नावाने ओळखले जाते. पृथ्वी उजवीकडून डाव्या दिशेने फिरते. याचबरोबर चंद्र असो किंवा सूर्य किंवा तारे सर्व याच दिशेने फिरतात असे या लोकांचे मानणे आहे. याचमुळे या समुदायाच्या लोकांनी घड्याळाची दिशाच बदलली आहे.
गोंड समुदायाच्या लोकांच्या विवाहाची पद्धत देखील काहीशी वेगळी आहे. या समुदायात वधूवराच्या सप्तपदी इतर लोकांच्या तुलनेत उलट्या दिशेने पूर्ण करतात. या समुदायाचे लोक काही वृक्षांची पूजा करतात. छत्तीसगडच्या या भागात सुमारे 10,000 लोक राहतात.