मुंबई : Petrol Diesel Latest News: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीबाबत चिंता व्यक्त करताना आता एक चांगली बातमी आहे. E20 पेट्रोलचा वापर दुचाकी आणि कारमध्ये करण्यास परवानगी देण्यात आली आहे. E20 म्हणजे एक पेट्रोल ज्यामध्ये 20 टक्के इथेनॉल (Ethanol Blend Petrol) मिसळले जाईल. केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने E20 वापरण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे.


E20 पेट्रोल वापरण्याची परवानगी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने म्हटले आहे की, E20 हे एक पेट्रोल आहे जे पर्यावरणासाठीही चांगले आहे. कारण ते कार्बन मोनोऑक्साइड आणि हायड्रोकार्बन्स सामान्य पेट्रोलपेक्षा खूपच कमी उत्सर्जित करतात. या इंधनासाठी कार आणि बाईक उत्पादकांना स्वतंत्रपणे E20साठी कोणते वाहन योग्य आहे ते सांगावे लागेल, यासाठी वाहनात स्टिकर देखील लावावे लागेल.


E20 पेट्रोलचे फायदे


2014 मध्ये पेट्रोलमध्ये 1 टक्क्यांपेक्षा कमी इथेनॉल मिसळले गेले होते. नंतर ते 8.5 टक्के केले गेले. आता पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल जोडण्याचे लक्ष्य आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे अनेक फायदे आहेत.


1. पहिला फायदा म्हणजे पेट्रोलियमवर भारताचे अवलंबून राहण्याचे प्रमाणात कमी होईल. सध्या भारत आपल्या गरजेच्या 83 टक्के तेल आयात करतो.
2. कार्बन डाय ऑक्साईड (CO2) कमी केल्यास वातावरणाचे नुकसानही कमी होईल.
3. इथेनॉलचा अधिकाधिक उपयोग केल्याने शेतकऱ्यांना फायदा होईल, त्यांचे उत्पन्न वाढेल. कारण इथेनॉल ऊस, मका आणि इतर अनेक पिकांपासून बनविला जातो.
4. साखर कारखानदारांना उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळेल. ज्यामधून त्यांचे शेतीतील थकबाकी परतफेड करण्यात ते सक्षम होतील.
5. इथेनॉल हे खूपच किफायतशीर आहे. त्यामुळे ग्राहकांनाही पेट्रोलच्या वाढत्या किंमतींपासून थोडा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.


2025 पर्यंत 20 टक्के इथेनॉल मिश्रित करण्याचे लक्ष्य


केंद्र सरकारने 2030 पर्यंत 20 टक्के इथॅनॉल मिश्रित पेट्रोल करण्याचे लक्ष्य ठेवले होते. परंतु आता पाच वर्षांपूर्वी केवळ 2025 मध्ये हे साध्य करण्याचे नियोजन आहे. गेल्या वर्षी सरकारने 2022 पर्यंत पेट्रोलमध्ये 10 टक्के इथॅनॉल मिश्रित करण्याचे लक्ष्य ठेवले होते. ऑक्टोबरमध्ये सुरू होणाऱ्या वर्षात सध्याच्या इथेनॉल पुरवठा पेट्रोलमध्ये 8.5 टक्के इथेनॉल मिश्रित आहे. जे 2022 पर्यंत वाढवून 10 टक्के केले जाईल.


सरकारने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे, 2025 पर्यंत 20 टक्के इथेनॉल मिश्रित करण्यासाठी 1200 कोटी मद्य, इथेनॉल आवश्यक असेल. 700 दशलक्ष लिटर इथेनॉल तयार करण्यासाठी साखर उद्योगाला 6 दशलक्ष टन अतिरिक्त साखर वापरावी लागेल. तर इतर पिकांतून 500 दशलक्ष लिटर इथेनॉल तयार केले जाईल.