नवी दिल्ली : आयकर भरणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. आता 15 दिवसातच इनकम टॅक्सचा रिफंड मिळणार आहे. याआधी इनकम टॅक्स रिफंड पेमेंटसाठी 2 ते 3 महिने लागत होते. सूत्रांच्या माहितीनुसार केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड सीबीडीटीने इनकम टॅक्स विभागाला इनकम टॅक्स रिफंड प्रक्रिया लवकरात लवकर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. इनकम टॅक्स विभागाच्या एका अधिकाऱ्याचं म्हणणं आहे की, ज्यांनी इनकम टॅक्स रिटर्न सबमिट केलं आहे आणि ई-वेरिफिकेशन झालं आहे अशा लोकांना आता 10 ते 12 दिवसात रिफंड मिळत आहे.


ई-वेरिफिकेशन महत्त्वाचं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इनकम टॅक्स विभाग याबाबत जलद काम करत आहे. अधिकाऱ्यांच्या नुसार. ज्यांचं ई-वेरिफिकेशन झालं नसेल अशा व्यक्तींचं रिफंड येण्यासाठी वेळ लागू शकतो. इनकम टॅक्स भरणाऱ्या व्यक्तींनी लवकरात लवकर इनकम टॅक्स रिटर्न भरल्यानंतर ई-वेरिफिकेशन केलं पाहिजे.


31 ऑगस्टपर्यंत मुदत


जर तुमचा जास्त टॅक्स कापला गेला आहे तर तुम्ही इनकम टॅक्स रिटर्न फाईल करुन रिफंड क्लेम करु शकता. जर तुम्ही इनकम टॅक्स रिटर्न फाईल नाही करत तर तुमचं रिफंड क्लेम नाही होणार. आर्थिक वर्ष 2017-18 साठी इनकम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट आहे. यानंतर तुम्हाला रिटर्न फाईल करण्यासाठी 5,000 रुपए दंड लागू शकतो.