मुंबई : चप्पल-बुटसाठी भारतात नावाजलेली कंपनी 'बाटा' इंडिया लिमिटेडला एका ग्राहकाकडून कॅरी बॅगचे 3 रुपये घेणे महागात पडले आहे. ग्राहक न्यायालयाने 'बाटा' कंपनीला 9 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय न्यायालयाने कंपनीला सर्व ग्राहकांना कॅरी बॅग मोफत देण्याचा आदेश दिला आहे. हा सर्व प्रकार चंदीगड येथे घडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंदीगड येथे राहणारे रहिवासी दिनेश पार्षद रतूडी यांनी 5 फेब्रवारीला सेक्टर 22 मध्ये असलेल्या बाटाच्या दुकानातून बूट खरेदी केले. बुटांची किंमत होती 399 रुपये, तरी दुकानदाराने त्यांच्याकडून 402 रुपये वसुल केले. 


जेव्हा रतूडी यांनी अतिरिक्त पैसे घेतल्याचा विरोध केला, तेव्हा दुकानदाराने सांगितलं की, बुट कॅरी बॅगमध्ये ठेवून दिले आहेत, आणि कॅरी बॅगची किंमत 3 रुपये आहे. म्हणून बुटांच्या किंमतीत कॅरी बॅगची किंमत वसूल करण्यात आली आहे.


ही सर्व घटना बघून रतूडी यांनी अतिरिक्त पैसे वसूल केल्याचा प्रचंड विरोध केला आणि सांगितलं की, दुकानदाराचे कर्तव्य आहे कोणत्याही ग्राहकाला सामान खरेदी केल्यानंतर तो सामान कॅरी बॅगमध्ये ठेवून द्यायला हवा आणि त्या कॅरी बॅगची कोणतीही अतिरिक्त किंमत वसूल का करावी. मात्र, दुकारनदाराने त्या ग्राहकाकडे लक्ष दिलं नाही.


दिनेश पार्षद रतूडी यांनी ग्राहक न्यायालयाकडे धाव घेतली आणि दुकान मालकाविरोधात आणि बाटा कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल केली.


ग्राहक मंचने पूर्ण प्रकरणाची सुनावणी केली. दरम्यान, बाटा कंपनीने तर्क दिले की, पेपर बॅगसाठी 3 रुपये चार्ज पर्यावरण संवर्धनासाठी ठेवण्यात आला आहे. फोरमने या तर्कला नाकारत म्हटले आहे की, जर 'बाटा' कंपनी पर्यावरण रक्षणाचे काम करत असेल, तर कंपनीने तक्रारदाराला बॅग फ्री द्यायला हवी.


ग्राहक न्यायालयाने तक्रारीचा निर्णय तक्रारदाराच्या बाजूने लावला आहे. आपल्या निर्णयामध्ये न्यायालयाने बाटा कंपनीकडून, पेपर बॅगसाठी ग्राहकाकडून घेतलेले 3 रुपये परत करावेत, तसेच 3 हजार रुपये आणि न्यायालयमध्ये खटला चालवण्यासाठी आलेला खर्च 1 हजार रुपये दिनेश पार्षद रतूडी यांना देण्याचा आदेश दिला आहे.



याशिवाय, न्यायालयाने बाटा कंपनीला राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या कंज्यूमर लिगल ऐडच्या खात्यात 5 हजार रुपये जमा करण्याचे देखील आदेश दिले आहेत.