आगरताळा : महिलांना पहिल्या दोन मुलांच्या वेळेस 24 महिन्यांची प्रसुती रजा त्रिपूरा सरकारने जाहिर केली आहे. त्रिपूरामध्ये फेब्रुवारीत विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. 


 बैठकीत घेतला निर्णय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुचना आणि वित्तमंत्री भानुलाल साहा यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या साप्ताहिक कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हि सुट्टी महिला कर्मचारी बाळाच्या जन्मानंतर बाळ 18 वर्षांचं होईपर्यंत केव्हाही घेऊ शकतात.


अजून एक प्रस्ताव


यापुर्वी भारतीय जनता पार्टी सरकारने जाहीर केलेल्या पत्रकात ज्यांना दोनपेक्षा अधिक मुले आहेत त्यांना सरकारी नोकरी दिली जाणार नाही, असे जाहिर करण्यात आले होते. त्याचबरोबर राज्यातील सर्व बालकांचे शालेय शिक्षण मोफत करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.