Paytm ग्राहकांना मिळणार मोठा दिलासा, UPI बाबत मोठी अपडेट समोर
पेटीएमची सेवा आता सुरुच राहणार आहे. पेटीएमच्या या निर्णयामुळे कोट्यावधी ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
Paytm UPI Update : गेल्या काही दिवसांपासून पेटीएम वापरकर्त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पण आता पेटीएम युजर्सला मोठा दिलासा मिळाला आहे. पेटीएमला नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)कडून थर्ड पार्टी अॅप्लिकेशन प्रोव्हायडरचे लायसन्स मिळाले आहे. त्यामुळे पेटीएमची सेवा आता सुरुच राहणार आहे. पेटीएमच्या या निर्णयामुळे कोट्यावधी ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
चार मोठ्या बँकाशी टायअप
एनपीसीआयने नुकतंच गुरुवारी एक निवेदन जारी केलं आहे. यात त्यांनी पेटीएमला नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)कडून थर्ड पार्टी अॅप्लिकेशन प्रोव्हायडरचे लायसन्स मिळाले आहे. त्यामुळे आता ग्राहकांना पेटीएम प्लॅटफॉर्मवरुन गुगल पे, फोन पे, भारत पे अॅपप्रममाणेच यूपीआय सर्व्हिसचा वापर करता येणार आहे. पेटीएमसोबत अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि येस बँक या चार बँकांनी करार केला आहे.
ग्राहकांना मोठा दिलासा
या चारही बँका पेटीएमसाठी पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडरप्रमाणे काम करणार आहेत. तर येस बँक ही पेटीएमसाठी सध्याच्या आणि नव्या यूपीआय मर्चंट्सचे अधिग्रहण करणाऱ्या बँकेप्रमाणे काम करणार आहे. यामुळे पेटीएमच्या ग्राहकांच्या युपीआय आयडी बदलण्यात येणार आहे. पूर्वी पेटीएमच्या युपीआय आयडीवर शेवटी @Paytm लिहिण्यात येत होतं. पण आता त्याऐवजी @YesBank असे नमूद केले जाणार आहे. पण यामुळे पेटीएम ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान भारतीय रिझर्व्ह बॅंकेने (RBI) पेटीएम पेमेंट्स बॅंकेवर कठोर कारवाई करण्यात आली होती. आरबीआय बॅंक नियमांच्या कायदा 1949 च्या कलम 35A अंतर्गत पेटीएम (paytm payments) पेमेंट्स बॅंक लिमिटेडच्या सेवांवर बंदी घालण्यात आली होती. आरबीआयच्या नियमांचे पालन न केल्यामुळे पेटीएमवर ही कारवाई करण्यात आली होती. पेटीएम या भारतातील आघाडीच्या पेमेंट्स आणि आर्थिक सेवा कंपनीने घोषणा केली आहे की, त्यांचे मेड-इन-इंडिया क्यूआर कोड, साऊंडबॉक्स आणि कार्ड मशिन 15 मार्च 2024 नंतर देखील नेहमीप्रमाणे कार्यरत राहणार आहेत. शुक्रवारी भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) एफएक्यू रीलीज केल्यानंतर याची पुष्टी मिळाली आहे.