नवी दिल्ली : देशातील प्रमुख शेअर बाजार एनएसईने (NSE)ने शुक्रवारी गुंतवणूकदारांना म्हटले की, त्यांनी फक्त नोंदणीकृत शेअर ब्रोकर्सकडूनच व्यवहार करावेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतेच नॉन रजिस्टर्ड संस्थाच्या अंतर्गत सर्वसामान्य गुंतवणूकदारांना मोठ मोठ्या परताव्याचे अमिष देऊन फसवणूकीच्या घटना समोर आल्या आहेत.


पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार नॅशनल स्टॉक एक्सचेंजने म्हटले आहे की, गुंतवणूकदरांनी कोणतीही निश्चित गॅरंटी रिटर्न देणाऱ्या शेअर दलालांसोबत व्यवहार करू नये.


युनिट रजिस्टर्ड डिटेल्सची माहिती घ्या
NSEने म्हटले आहे की, गुंतवणूकदारांना सल्ला दिला जातो की, त्यांनी फक्त सेबी रजिस्टर्ड शेअर ब्रोकर्ससोबत व्यवहार करायला हवा.


तसेच उक्त यूनिटच्या रजिस्ट्रेशन डिटेल्सची चौकशी करा. शेअर बाजारने गुंतवणूकदारांना इशारा दिला आहे की, सेबी रजिस्टर्ड शेअर ब्रोकर सोडून अन्य कोणत्याही माध्यमातून इतर दलालांसोबत व्यवहार करू नये.