NTPC Job: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी एक्झिक्युटिव्ह पदे भरली जाणार आहेत. 
या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटवर याचा तपशील पाहू शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक्झिक्युटिव्ह या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे पीजी पदवी/ पीजी डिप्लोमा/ ग्रामीण व्यवस्थापन/ ग्रामीण विकास/ विस्थापन/ पुनर्वसन यासह काही शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.


उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून ग्रामीण व्यवस्थापक / ग्रामीण विकास / विस्थापन / पुनर्वसन / पुनर्वसन / समुदाय विकास / स्थानिक प्रशासन / स्थानिक विकास / उपजीविका / सामाजिक उद्योजकता / सामाजिक विकास / सामाजिक प्रशासन / शाश्वत विकास / विकास धोरण आणि सराव / विकास अभ्यास पूर्ण केलेला असावा. यासोबतच एमएसडब्ल्यू किंवा एमबीए किंवा अभियांत्रिकीमध्ये पदवी असणे आवश्यक आहे.


एक्झिक्युटिव्ह या पदांवर नोकरी करणाऱ्यांना उमेदवारांना दरमहा ९० हजार रुपये पगार दिला जाणार आहे. याव्यतिरिक्त, स्वत: जोडीदार आणि दोन मुलांसाठी एचआरए/कंपनी निवास आणि वैद्यकीय सुविधा देखील दिल्या जाणार आहेत. 


अधिकृत वेबसाइट careers.ntpc.co.in/careers वर जाऊन उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना वैध ईमेल आयडीवरुनच अर्ज करावा लागणार आहे. सामान्य / इडब्ल्यूएस / ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ३०० रुपये अर्ज शुल्क भरावा लागले. हे शुल्क नॉन-रिफंडेबल असेल. SC/ST/PWBD/XSM श्रेणी आणि महिला उमेदवारांकडून कोणतेही अर्ज शुल्क आकारण्यात येणार नाही. अर्ज पूर्ण भरुन झाल्यानंतर डाऊनलोड करा.